उधार घेतलेले 200 रुपये परत न केल्याने उत्तर प्रदेशातील देवरिया येथे मेव्हण्याने कोंबडा कापण्याच्या चाकूने वार करून आपल्या मेव्हण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला अटक केली. मृताच्या घरात एकच गोंधळ उडाला.
बाघौचघाट पोलीस स्टेशन हद्दीतील बजरहान गावात राहणारा झाकीर अन्सारी (३२) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. झाकीरची बहीण जुबेन हिचा विवाह रामपूर येथील नियामतशी झाला होता. मृत झाकीर याचे बजरहान गावाजवळील बुधन चौकात चिकनचे दुकान होते. नातेसंबंधामुळे मयत झाकीरने त्याचे दुकान त्याच्या मेव्हण्याचा लहान भाऊ मुनीब याला दिले होते.
तीन दिवसांपूर्वी झाकीरने मुनीबकडून 200 रुपये उसने घेतले होते. झाकीर गेल्या गुरुवारी संध्याकाळी चिकनच्या दुकानात गेला होता. यादरम्यान मुनीबने दोनशे रुपये परत मागायला सुरुवात केली. त्यावर झाकीरने त्याचे दुकान परत करण्याबाबत बोलणे सुरू केले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हाणामारी झाली. दरम्यान, मुनीबने चिकन कापण्याच्या शस्त्राने झाकीरच्या पोटात वार केले.
या घटनेने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी झाकीरला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. झाकीर पुढच्या महिन्यात (एप्रिल) लग्न करणार होता. दोघांच्याही घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती, मात्र आता झाकीरच्या हत्येनंतर दोन्ही कुंटूबांवर शोककळा पसरली आहे.
मृत झाकीर हा तीन भावांमध्ये दुसरा होता. वडील मोलमजुरी करतात.याप्रकरणी बाघौचघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी मृत्युंजय राय यांनी सांगितले की, आधी २०० रुपयांवरून वाद झाला, नंतर मारामारी झाली. त्यानंतर मुनीबने झाकीरची हत्या केली. आरोपी मुनीब याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.