Cyber Crime: +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने का दिला इशारा?

Cyber Crime: आर्थिक फसवणुकीसाठी वैयक्तिक माहितीचे लक्ष्य ठेवून फसव्या WhatsApp कॉल्सबद्दल दुरसंचार विभागाने चेतावणी दिली आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Cyber Crime: मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून मोबाईल जणू मुलभूत गरज बनला आहे. मात्र याचे तोटे देखील तेवढेच आहेत. मोबाईलमुळे सायबर क्राईम देखील वाढत आहेत. दुरसंचार विभागाने मोबाईल वापरकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे. WhatsApp वर +92 सारख्या परदेशी मूळ क्रमांकावरुन कॉल येत असतील तर सावधानतेचा इशारा दिला आहे. या नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे हे कॉल उचलू नका, असे दुरसंचार विभागाने म्हटले आहे.

+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका, असे दुरसंचार विभागाने म्हटले आहे.

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत की त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे.

सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी या कॉलद्वारे लोकांना धमकावून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे कॉल आल्यास कुठलीही माहिती देऊ नका. सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे.

Cyber Crime
Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ

दूरसंचार विभागाने काय म्हटलं?

दूरसंचार विभाग आपल्या वतीने कोणालाही असे कॉल करण्यासाठी सहमती दिली नाही. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही गोष्टी शेअर न करण्यास सांगितले. असे कॉल प्राप्त करणाऱ्या लोकांची प्रकरणे वाढत आहेत, ज्यामध्ये दूरसंचार विभागाच्या नावाने कॉल करणारे त्यांचे सर्व मोबाईल नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा त्यांच्या मोबाईल नंबरचा काही बेकायदेशीर कामांमध्ये गैरवापर होत असल्याची धमकी देत ​​आहेत.

याशिवाय, सरकारी अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून लोकांची फसवणूक करण्यासाठी परदेशी नंबरचा (+92-xxxxxxxxxx) मोबाइल नंबरवरूनही व्हॉट्सॲप कॉल्स आले आहेत. +92 हा पाकिस्तानचा कोड आहे. 

Cyber Crime
Demonetisation: "नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.