Telecom Service : कॉल ड्रॉप्स, स्लो इंटरनेटने ग्राहक त्रस्त; टेलिकॉम विभागानेही टोचले कान

नेटवर्कची खराब क्वालिटी, कॉल ड्रॉप अशा समस्यांबद्दल अनेकदा ग्राहक तक्रार करत आहेत.
5-G spectrum auction Central Government Telecom service provider
5-G spectrum auction Central Government Telecom service providerSakal
Updated on

कॉल ड्रॉप्स आणि स्लो इंटरनेट सेवेची समस्या गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सतावू लागली आहे. टेलिकॉम सुविधांमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने आता टेलिकॉम विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. टेलिकॉम विभागाने TRAI ला या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्यास सांगितलं आहे.

5-G spectrum auction Central Government Telecom service provider
Mobile Phone Tips: मोबाईल हरवल्यास वापरा 'या' ट्रीक्स, नाहीतर बँक बॅलेंस होईल खाली..

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, TRAI ला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश टेलिकॉम विभागाने दिले आहेत. तसंच मोबाईल ऑपरेटर्सने त्यांच्या सुविधा सुधाराव्यात यासाठी आदेशही देण्यात आले आहेत. टेलिकॉम सुविधांमध्ये वारंवार सांगूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. नेटवर्कची खराब क्वालिटी, कॉल ड्रॉप अशा समस्यांबद्दल अनेकदा ग्राहक तक्रार करत आहेत.

5-G spectrum auction Central Government Telecom service provider
Mobile addiction : मुलांची फोनची सवय कशी सोडवाल ?

अशा सुविधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणं हे काम TRAI चं आहे. सरकारने हा ग्राहकांच्या चिंतेचा महत्त्वाचा विषय असल्याने या प्रकरणी सल्लागाराची भूमिका घेत लक्ष घातलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, TRAI सोबत आता चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता नेटवर्कची क्वालिटी सुधारेल आणि ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल, अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.