D. K. Shivakumar : आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा मोठा कट; CBI ने नोटीस बजावताच उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावली आहे.
DK Shivakumar
DK Shivakumaresakal
Updated on
Summary

'माझा छळ करून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे सुरु आहे. यात काही मोठे लोक आहेत.'

बंगळूर : आपणास राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षड्‍यंत्र सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केला. बेकायदेशीर मिळकत प्रकरणात सीबीआयने (CBI) त्यांना नोटीस बजावल्याबद्दल पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

DK Shivakumar
'मला आमदारकीचा विजयी चौकार मारण्याची संधी दे'; कोल्हापूरच्या अंबाबाईला शिंदे गटाच्या आमदारानं घातलं साकडं

ते म्हणाले, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावली आहे. माझा छळ करून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे सुरु आहे. यात काही मोठे लोक आहेत. त्यांचे मोठे षड्‍यंत्र सुरू आहे, असेही ते म्हणाले.

DK Shivakumar
जयश्रीताईंनी अजितदादांची भेट घेताच जयंत पाटलांनी गाठला मदनभाऊंचा बंगला; राजकीय चर्चांना आलं उधाण

सरकारने आधीच खटला मागे घेतला आहे. मात्र, ते कोणत्या कारणाने नोटीस दिली माहीत नाही. सीबीआय प्रथम त्यांचा तपास फर्म स्तरावर पूर्ण करेल आणि नंतर ते वैयक्तिकरित्या माझ्याकडे येतील.

आपल्याला तुरुंगात टाकण्यात त्यांना रस असेल तर तुरुंगात टाकू द्या, असा संताप त्यांनी व्यक्त केला. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही. आपल्याला न्याय मिळेल. सरकारने हे प्रकरण लोकायुक्तांना आधीच दिले आहे. लोकायुक्त पुढील चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.