'गुरमीत राम रहीम कट्टर कैद्यांमध्ये मोड नाही, म्हणून त्याला पॅरोल'

Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram Rahimesakal
Updated on
Summary

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची काही दिवसांपूर्वी पॅरोलवर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची (Gurmeet Ram Rahim) काही दिवसांपूर्वी फर्लोवर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. दरम्यान, पॅरोल अथवा फर्लोवर सुटण्याच्या उद्देशानं तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह हा कट्टर कैद्यांच्या श्रेणीत मोड नसल्याचं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं (Punjab and Haryana High Court) म्हंटलंय. न्यायमूर्ती राज मोहन सिंह (Justice Raj Mohan Singh) यांच्या कोर्टानं पटियालाच्या एका रहिवाशाची याचिकाही निकाली काढलीय. गुरमीत राम रहीम सिंह याला फेब्रुवारीमध्ये दिलेल्या फर्लोला आव्हान दिलं गेलं होतं. न्यायालयानं गुरुवारी हा आदेश दिलाय.

रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या डेरा सच्चा सौदाच्या (Dera Sacha Sauda) प्रमुखाला 7 फेब्रुवारीला हरियाणा सरकारनं कट्टर कैद्यांच्या श्रेणीत येत नसल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर, गुरुग्राममध्ये त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तीन आठवड्यांची रजा मंजूर करण्यात आली होती. फर्लो म्हणजे, तुरुंगातून दोषींची अल्पकालीन तात्पुरती सुटका असते.

Gurmeet Ram Rahim
'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, भारताशी त्यांचा काही संबंध नाही'

डेरा प्रमुखाच्या वकिलांपैकी एक असलेल्या कनिका आहुजा (Kanika Ahuja) यांनी शुक्रवारी सांगितलं की, राम रहीम हा कट्टर कैद्यांच्या श्रेणीत मोड नाही, असं न्यायालयानं म्हंटलंय. याचिकाकर्ते परमजीत सिंह साहोली (Paramjit Singh Sohali) यांनी असा युक्तिवाद केला होता की, 'राम रहीमनं एक गुन्हा केलाय त्यासाठी त्याला दोषी ठरवण्यात आलंय. त्यामुळं त्याला सोडण्यात येऊ नये.' त्यानंतर डेरा प्रमुखाच्या वकिलानं असा युक्तिवाद केला की, राम रहीम कट्टर कैद्यांच्या श्रेणीत येत नाही. कारण, त्याला दोन खून खटल्यांमध्ये गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं, असं त्यांनी नमूद केलंय.

Gurmeet Ram Rahim
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; भाजपच्या 9 आमदारांची बिनविरोध निवड

'डेरा'चे मुख्यालय असलेल्या सिरसा येथील आश्रमात दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुलामधील विशेष सीबीआय न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं होतं. 2002 मध्ये डेरा व्यवस्थापक रणजित सिंह यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गेल्या वर्षी डेरा प्रमुख रणजित सिंह यांच्यासह चार जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं. 2019 मध्ये राम रहीम आणि इतर तिघांना दोषी ठरवण्यात आलं होतं. तर 2002 मध्ये एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणीही त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()