Ram Rahim: वाढदिवसाचे औचित्य अन् निवडणुकीची चाहूल, गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर!

Ram Rahim Released From Jail:बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आला आहे. त्याला 21 दिवसांची फरलो मिळाली आहे.
Ram Rahim Released From Jail
Ram Rahim Released From JailESakal
Updated on

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता तुरुंगातून त्याची सुटका झाली. यावेळी राम रहीमला 21 दिवसांची रजा मिळाली आहे. राम रहीम रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कडेकोट बंदोबस्तात त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. याआधीही त्याला अनेक वेळा तुरुंगातून रजा मिळाली आहे. डेरा प्रमुख राम रहीम बलात्कार आणि हत्या प्रकरणात तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीम सिंगचा 15 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा आश्रमात वाढदिवस साजरा करणार आहेत. यासाठी अनेक अनुयायी उपस्थित राहणार आहेत. वाढदिवसासाठी २१ दिवसांची सुट्टी घेऊन तो बाहेर आला आहे. यानंतर 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी तो आपल्या अनुयायांसह बागपत डेरामध्ये उपस्थित राहणार आहेत. गुरमीत सिंगचे अनुयायी दरवर्षी तुरुंगातच राखी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मात्र यावेळी तो वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर आला आहे. यावेळी गुरमीत राम रहीम बागपत येथील बर्नवा आश्रमात राहणार आहे. 2024 मध्ये गुरमीत राम रहीम दुसऱ्यांदा बाहेर आला.

Ram Rahim Released From Jail
Gurmeet Ram Rahim: राम रहीम पॅरोलच्या मुद्द्यावरून हायकोर्टाकडून सरकारला झटका, आता कोर्टाच्या परवानगीशिवाय...

गुरमीत सिंगला सुनारिया तुरुंगातून आश्रमात नेण्यासाठी त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत आली होती. तिच्या सोबत अनेक वाहनांचा ताफा होता. मात्र एकच वाहन राम रहीमला नेण्यासाठी कारागृह संकुलाच्या पार्किंगमध्ये पोहोचले होते. गुरमीत सिंग तुरुंगातून बाहेर येताच उत्तर प्रदेशला निघाला. त्यानंतर त्याचा ताफा पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान गुरमीत राम रहीम सिंगने 2024 मध्ये सुट्टीची मागणी केली होती. राम रहीमने 21 दिवसांच्या रजेसाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्याची रजा मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान याआधीही त्याने अशी रजा घेतली आहे. यामुळे तो अनेक वेळा चर्चेत देखील आला आहे.

याआधी राम रहीम किती वेळा तुरुंगाबाहेर आला होता?

24 ऑक्टोबर 2020 मध्ये राम रहीमला रुग्णालयात दाखल केलेल्या आईला भेटण्यासाठी पहिल्यांदा एक दिवसाचा पॅरोल मिळाला होता. त्यानंतर 21 मे 2021 रोजी आईला भेटण्यासाठी दुसऱ्यांदा 12 तासांसाठी पॅरोल देण्यात आला. 7 फेब्रुवारी 2022 मध्ये डेरा प्रमुखाला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी 21 दिवसांची रजा मिळाली. तर जून 2022 मध्ये 30 दिवसांसाठी राम रहीमला पॅरोल मिळाला होता.

यानंतर 14 ऑक्टोबर 2022 मध्ये राम रहीमला 40 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला. या काळात त्यांनी बागपत आश्रमात मुक्काम केला आणि म्युझिक व्हिडिओही रिलीज केले होते. त्यानंतर 21 जानेवारी 2023 मध्ये सहाव्यांदा 40 दिवसांचा पॅरोल मिळाला. शाह सतनाम सिंग यांच्या जयंतीला उपस्थित राहण्यासाठी तो तुरुंगाबाहेर आला होता. 20 जुलै 2023 रोजी सातव्यांदा 30 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला. 21 नोव्हेंबर 2023 ला राम रहीम 21 दिवसांची सुट्टी घेऊन बागपत आश्रमात गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.