गुरमीतला रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास आहे. दोन तास आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं होतं. कोरोना चाचणी करण्यास गुरमीतने नकार दिला होता.
गुरुग्राम : रोहतक येथील सुनारिया जेलमध्ये बलात्कार आणि हत्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Gurmeet Ram Rahim) कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याला मेदांता रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रविवारी दुपारी १२ वाजता त्याला सुनारिया जेलमधून रुग्णालयात आणण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासू त्याची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. पोटात दुखत असल्याने त्याला पीजीआय रोहतकमध्ये भरती करण्यात आलं होतं. यावेळी तपासणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim tested positive for Covid-19)
३ जूनला तब्येत बिघडल्याने गुरमीतला पीजीआय रोहतकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आलं. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गुरमीतला रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास आहे. दोन तास आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं होतं. कोरोना चाचणी करण्यास गुरमीतने नकार दिला होता.
गुरमीत २५ ऑगस्ट २०१७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावणी आहे. १६ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात गुरमीतसह अन्य तीन आरोपी दोषी आढळले आहेत. कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णलाल यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.