कोरोना काळात देशातील शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे यंदा (२०२०-२१) विक्रमी धान्योत्पादन होईल, असा तिसरा सुधारित अंदाज केंद्र सरकारने आज जाहीर केला.
नवी दिल्ली : कोरोना काळात (corona crisis) देशातील शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे यंदा (२०२०-२१) ३०.५४ कोटी टन एवढे विक्रमी धान्योत्पादन (grain production in India) होईल, असा तिसरा सुधारित अंदाज केंद्र सरकारने आज जाहीर केला. यात गहू, तांदूळ, हरभरा, भुईमुगाचे उत्पादन आतापर्यंतचे सर्वाधिक असेल. मागील वर्षीच्या तुलनेत (२०१९-२०) यंदा ७९.४ लाख टनांनी उत्पादन वाढीव असून मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही वाढ २.६६६ कोटी टनांची आहे. (despite corona crisis Record grain production forecast Record grain production in India)
वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनाबाबत राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कृषी मंत्रालयाने धान्योत्पादनाचा तिसरा सुधारित अंदाज जाहीर करताना यंदा ५०.५४४ कोटी एवढे विक्रमी उत्पादन होईल असे म्हटले आहे. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या कामगिरीसाठी शेतकऱ्यांना, कृषी शास्त्रज्ञांना आणि केंद्र सरकारच्या धोरणांना श्रेय दिले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा तांदळाचे १२.१४६ कोटी टन तर गव्हाचे १०.८७५ कोटी टन एवढे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. तर भरड धान्य ४.९६ कोटी टन, मका ३.०२४ कोटी टन, कडधान्ये (डाळी) २.५५८ कोटी टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. यामध्ये तूर उत्पादनाचा अंदाज ४१.४ लाख टन एवढा आहे. तर, हरभऱ्याचे १.२६१ कोटी टन असे विक्रमी उत्पादन होईल, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.
अर्थात, धान्य आणि कडधान्याप्रमाणेच तेलबिया उत्पादनामध्येही कृषी क्षेत्राची कामगिरी सरस (३.६५७ कोटी टन उत्पादन) असेल असा दावा सरकारचा आहे. यानुसार यंदा भुईमुगाचे १.०१२ कोटी टन आणि मोहरीचे ९९.९ लाख टन असे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. तर सोयाबिनचे १.३४१ कोटी टन होईल असा अंदाज आहे. दरम्यान, उसाचे ३९.२८० कोटी टन, तर कपाशीचे ३.६४९ कोटी गासड्या एवढे उत्पादन होईल, असाही अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.