स्वस्तातील जलशुद्धीकरण उपकरण विकसित

कोरोना साथीमुळे वारंवार हात धुणे, फरशा, पृष्ठभागांची स्वच्छता आदींसाठी पाण्याचा पूर्वीपेक्षा अधिक वापर होत आहे.
Water
WaterSakal
Updated on

नवी दिल्ली - कोरोना (Corona) साथीमुळे वारंवार हात धुणे, फरशा, पृष्ठभागांची स्वच्छता आदींसाठी पाण्याचा (Water) पूर्वीपेक्षा अधिक वापर होत आहे. हेच लक्षात घेऊन आयआयटी, जोधपूरने कमी किमतीतील जलशुद्धीकरण उपकरण (water purification equipment) विकसित केले आहे. राजस्थानातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये ते बसविले जाईल.

पाणी शुद्ध करण्यासह त्याच्या पुनर्वापरासाठी व या उपकरणात पडदा असलेले अल्ट्राफिल्टरेशन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे उपकरण पोर्टेबल असून गरजेनुसार इतर ठिकाणी सहजपणे नेता येऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात राजस्थानातील जोधपूर, सिरोही आणि झुनझूनू या जिल्ह्यांतील पाच शाळांमध्ये हे जलशुद्धीकरण उपकरण बसविण्यात येईल.

Water
पंतप्रधान महाशय, सभागृहात या, आमचं म्हणणं ऐकून घ्या!

आयआयटी, जोधपूरच्या रसायन - अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रदीप तिवारी यांनी सांगितले, की कोरोनामुळे हात धुण्यासह अन्य कारणांसाठी पाण्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे, वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी, पाण्याच्या नेमक्या पुरवठ्याची, जल अंदाजपत्रक व परीक्षणाची गरज आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी, जोधपूरचे तज्ज्ञ आपल्या कौशल्याचा वापर पाण्याचे प्रमाण व गुणवत्तेच्या गरजांकडे सर्वसमावेशक पद्धतीने पाहण्यासाठी करत आहेत.

तज्ज्ञांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी पुनर्वापर करण्याच्या दृष्टिने हे स्वदेशी जलशुद्धीकरण उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाचा मुख्य फायदा म्हणजे ते अंतिम वापरकर्त्याकडून वापरले जाते. मनुष्यबळ लागत नसल्याने हे उपकरण किफायतशीर ठरते. देशातील एकूण जलस्रोतांपैकी केवळ दोन टक्के जलस्रोत असलेल्या राजस्थानात अशा उपकरणांमुळे हात धुण्याला प्रोत्साहन मिळण्याचा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

Water
प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर नको; केंद्र सरकारची महत्त्वाची सुचना

कौशल्य विकासासाठीही उपयुक्त

उपकरण बसविणे, चालविणे व त्याची देखभाल यात शिक्षक, विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यावहारिक पैलूंची ओळख करून दिली जाते. त्यामुळे, प्राथमिक स्तरावरच कौशल्य विकासाच्या दृष्टीनेही या उपकरणाची ओळख महत्त्वाची आहे.

पाण्याचे शुद्धीकरण, जलसंधारण आणि पुनर्वापराच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आयआयटी, जोधपूरचे तज्ज्ञ काम करत आहेत. त्यातूनच या किफायतशीर जलशुद्धीकरण उपकरणाची निर्मिती केली आहे.

- प्रदीप तिवारी, प्रमुख, रसायन व अभियांत्रिकी विभाग, आयआयटी, जोधपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.