Rajnath Singh : सशक्त भारताच्या विकासाचा रोडमॅप

‘संकल्पपत्रा’बाबत राजनाथसिंह यांचा दावा
Rajnath Singh : सशक्त भारताच्या विकासाचा रोडमॅप
राजनाथसिंहesakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘मोदींची गॅरंटी २४ कॅरेट सोन्यासारखी असून भाजपचे हे संकल्पपत्र हे जगातील तमाम राजकीय पक्षांसाठी आदर्श आहे,’’ असे कौतुकोद्गार संरक्षण मंत्री आणि भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख राजनाथसिंह यांनी आज काढले. २०१९ मध्ये देण्यात आलेली सर्व आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली. संकल्पपत्राच्या माध्यमातून स्वाभिमानी आणि सशक्त भारताच्या निर्मितीचा रोडमॅप जनतेसमोर ठेवण्यात आला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Rajnath Singh : सशक्त भारताच्या विकासाचा रोडमॅप
Jalgaon Crime News : कौटुंबिक वाद टोकाला गेल्याने दुहेरी हत्याकांड

सामान्यांसाठी

भाजीपाला आणि डाळ उत्पादनाला चालना

घरनोंदणी शुल्कात कपात, बांधकाम खर्च कमी करण्याचा प्रयत्न

नोकरदार महिलांसाठी ठिकठिकाणी हॉस्टेल

श्रमिकांच्या किमान वेतनाचा वेळोवेळी आढावा

पेपर फोडणाऱ्यांना कठोर शिक्षेच आश्‍वासन

विद्यार्थ्यांसाठी ‘एक देश, एक ओळखपत्र’ योजना

Rajnath Singh : सशक्त भारताच्या विकासाचा रोडमॅप
Accident News: विजयपूरमध्ये भीषण अपघातात ४ ठार; तर तीन जण जखमी, सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली अन्...

योजना

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज १० लाखांवरुन २० लाख रुपयांवर

तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविणार

गर्भाशय तसेच ब्रेस्ट कॅन्सरवर मात करण्यासाठी योजना

श्री अन्न, नॅनो युरियाला प्रोत्साहन आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल

मच्छीमारांना व्यापक स्वरूपात मदत

वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न

‘ई-श्रम’च्या माध्यमातून जनकल्याणाच्या योजना राबविल्या जाणार

पीएम उज्वला योजना पुढील पाच वर्षांसाठी कायम राहणार

राज्य सरकारांच्या मदतीने विविध राज्यांत तीर्थयात्रा योजना

Rajnath Singh : सशक्त भारताच्या विकासाचा रोडमॅप
Crime News : बाहेर जाताना घराची चावी बुटात ठेवताय तर सावधान! आव्हाळवाडीत चार तोळे सोने व रोकड लंपास

इतर

महिलांच्या स्वयं सहायता समूहांना सेवा क्षेत्राशी जोडले जाणार

पोलिस स्थानकांत महिला डेस्कची स्थापना आणि त्याचा विस्तार

योग आणि आयुर्वेदाचा विस्तार, योग शिक्षण घेणाऱ्यांना प्रमाणपत्र

अवैधपणे विदेशात नेण्यात आलेल्या मूर्ती आणि कलाकृती परत आणणार

जगभरात संत तिरुवल्लूर केंद्राची स्थापना आणि तमिळी भाषेला प्रोत्साहन देणार

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न

२०३६ साली देशात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न

अयोध्येला आणखी विकसित केले जाणार, जगभर रामायण उत्सवाचे आयोजन

Rajnath Singh : सशक्त भारताच्या विकासाचा रोडमॅप
Nashik News : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे यात्रीनिवास धुळखात; बांधकामावर कोट्यवधी खर्च

रेल्वे

प्रतिक्षा यादी समाप्त करणार

रेल्वेच्या सर्व सेवांसाठी एकच सुपर ॲप आणणार

जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके, नव्या गाड्या आणि मेट्रो रेल्वेचा विस्तार

२०३० पर्यंत वंदे भारत स्लीपर रेल्वे

ईशान्य भारताच्या विकासावर विशेष लक्ष

उत्पादन

प्रत्येक क्षेत्रात देशाला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग बनविणार

एआय, अंतराळ आणि सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास

देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट

जनऔषधी केंद्रांचा व्यापक प्रमाणात विस्तार

भाजीपाला उत्पादन आणि स्टोअरेजसाठी नवीन क्लस्टर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.