Narendra Modi
Narendra Modi

Narendra Modi : मोदी गुरुजींची शाळा! एकनाथ शिंदे -फडणवीसांची वर्गात हजेरी

Published on

नवी दिल्ली : 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेच्या वेळात तणावाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. तणाव आणि परीक्षेची भीती दूर करण्यासाठी या संवादात्मक सत्रादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. 

आज दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला. 'परीक्षा पे चर्चा-२०२३' या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळाली. विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे २०० विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही चांगले काम केले तर आणखी चांगले काम करण्याचा दबाव वाढतो. मी राजकारणात आहे, प्रत्येक वेळी मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळवण्याचा माझ्यावर दबाव असतो. मात्र हजारोंच्या गर्दीतही फलंदाज लक्ष केंद्रित करतो. तो प्रेक्षकांच्या मागणीकडे लक्ष देत नाही आणि चेंडू पाहून त्यानुसार शॉट खेळतो, असे उदाहरण नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला दिले. 

Narendra Modi
PM Modi : 'या' कारणासाठी मी मोदींना भेटेन, सरकारनं 'हा' प्रस्ताव पास करावा; असं का म्हणाले रामभद्राचार्य महाराज?

नरेंद्र मोदी म्हणाले, करोडो विद्यार्थी माझी परीक्षा घेतात आणि त्यामुळे मला आनंद होतो. देशातील तरुण मन काय विचार करतात हे पाहणे माझे सौभाग्य आहे. कुटुंबांमध्ये मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. पण जर कुटुंबातील सदस्य केवळ त्यांच्या सामाजिक स्थितीवर आशा ठेवत असतील, तर ती चिंतेची बाब आहे. तुम्ही चांगले काम करत असाल तर प्रत्येकाला तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मी राजकारणात आहे आणि माझ्या बाबतीतही असेच घडते.

Narendra Modi
Sharad Pawar : "प्रकाश आंबेडकरांनी जपून..." ; शरद पवारांवरील वक्तव्यावर ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

परीक्षेत काही विद्यार्थी कॉपी करतात, यावर नरेंद्र मोदी म्हणाले, कॉपी आणि फसवणूक करणारे विद्यार्थी क्रियेटीव्हीटी दाखवतात. ते छोट्या अक्षरात चिठ्ठ्या बनवतात. मात्र आज जग बदलले आहे. एक-दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन आयुष्य घडवता येत नाही. कारण आज आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर परीक्षा आहे. पुढे गेल्यावर असे लोक फसतात. 

Narendra Modi
Weather Update: ऐन थंडीत राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.