नवी दिल्ली - ‘देशाची राज्यघटना दाखविणे व जातीनिहाय जनगणनेची मागणी करणे हे भाजपसाठी नक्षली विचार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य हे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे आहे,’ अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून केली.