Yellamma Devi : सौंदत्ती रेणुका देवीच्या चरणी भाविकांकडून भरभरुन दान; तब्बल 1 कोटी 3 लाख दानपेटीत जमा

दोन हजार रुपये मूल्याच्या नोटाही दानपेटीत सापडल्या.
Saundatti Yellamma Temple
Saundatti Yellamma Temple esakal
Updated on
Summary

१७ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत देणगी पेटीत जमा झालेल्या देणगीची मोजदाद करण्यात आली.

बेळगाव : सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या (Saundatti Renuka Devi) दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिराच्या दानपेटीत गेल्या चाळीस दिवसांत देणगी स्वरूपात एक कोटी तीन लाख रुपये जमा झाले.

Saundatti Yellamma Temple
Eid-e-Milad : शिमोगात 'ईद-ए-मिलाद'च्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक; 40 जण ताब्यात, तब्बल अडीच हजार पोलिस तैनात

१७ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत देणगी पेटीत जमा झालेल्या देणगीची मोजदाद करण्यात आली. त्यात ९३ लाख ६४ हजार २६० रुपयांची रोख देणगी जमा झाली आहे. यासह ७ लाख ५० हजार २६० रुपये किमतीचे सोने, १ लाख ८७ हजार ८६० रुपये किमतीची चांदी देणगी स्वरूपात मिळाली.

Saundatti Yellamma Temple
Udayanraje Bhosale : 'शंभूराज देसाईंची चप्पल साडेतीनशे रुपयांची, कोणी चोरली का बघा..'; असं का म्हणाले उदयनराजे?

दोन हजार रुपये मूल्याच्या नोटाही दानपेटीत सापडल्या. त्यामुळे भाविकांनी या नोटा दानपेटीत न टाकता त्या बदलून घ्याव्यात, असे आवाहन सौंदती मंदिर देवस्थान मंडळाने केले आहे. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एमपीबी महेश, देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मंदिराचे कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, धर्मादाय खाते, तहसीलदार आणि सौंदत्ती पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील दानपेटी उघडण्यात आली.

Saundatti Yellamma Temple
Divorce Case : घटस्फोटानंतरही पुन्हा जोडले जातात राजा-राणीचे संसार; महिला आयोगाचं 'हे' पाऊल ठरतंय निर्णायक

देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून डोंगरावर पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप आणि इतर विकासकामे केली जाणार आहेत. याप्रसंगी धर्मादाय खात्याचे सहायक आयुक्त बसवराज जिरग्याळ, मंदिराचे अधीक्षक अरविंद माळगे, सदस्य वाय. वाय. काळप्पणावर, लक्ष्मी हुली आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.