सुरत : तुम्ही देशातील अनेक मंदिरांमध्ये फुले आणि हार अर्पण करताना पाहिले असेल, परंतु जिवंत खेकडे अर्पण करण्याची एक अनोखी प्रथा आहे. हे कदाचित देशातील पहिले मंदिर असेल जिथे देवाला प्रसन्न करण्यासाठी जिवंत खेकडे अर्पण केले जातात. (Ramnath Shiv Ghela Temple surat)
सुरतमधील रामनाथ शिव घेला मंदिरात भक्तांकडून भगवान शिवशंकराला खेकडे अर्पण करण्यात आले. महादेवाला अर्पण केलेले खेकडे नंतर विधीनंतर तापी नदीत सोडले जातात. या अनोख्या प्रथेमुळे भक्तांमध्ये चर्चा होत. हे खेकडे अर्पण केल्या आरोग्याच्या समस्या भेडसावत नाहीत. तसेच मेलेल्या माणसांच्या इच्छा त्यांच्या मृत्यूनंतरही पूर्ण होतात, अशी श्रद्धा भक्तांची आहे.
सुरतमध्ये महादेव भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वर्षातून एकदा जिवंत खेकडा महादेवाला अर्पण करतात. तसेच या दिवशी स्मशानभूमीत, मृतांचे नातेवाईक मृत नातेवाईकांच्या आवडीचे अन्न आणि पेय देतात जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी.
एका महिलेने सांगितले की, महादेवाला खेकडे अर्पण केल्यास त्यांच्या कानाशी संबंधित समस्या दूर होतील. येथे वर्षातून एकदा खेकडे अर्पण केले जातात. आम्हाला विश्वास आहे की येथे खेकडे अर्पण केल्याने आमच्या मुलांचे कान दुखणार नाहीत."
रामनाथ मंदिरात शारीरिकदृष्ट्या कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असलेले लोक दर्शनासाठी येतात, परंतु यामध्येही कानाचे आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. महादेवाला खेकडे अर्पण केल्याने त्यांचे आजार दुर होतात, अशी त्यांची श्रद्धा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.