Go First : विमानतळावर प्रवाशांना सोडून जाण पडलं महागात;'गो फर्स्ट' ला १० लाखांचा दंड

गो एअरचे G8-116 बेंगळुरू - दिल्ली फ्लाइटने 9 जानेवारी रोजी 55 प्रवाशांना न घेता दिल्लीकडे उड्डाण केले होते.
Go First Airlines
Go First AirlinesSakal
Updated on

Go First Airlines News : महिला सहप्रवाशावर लघुशंका प्रकरणी DGCA ने एअर इंडियावर कारवाई केल्याची बातमी ताजी असतानाच आता DGCA ने गो फर्स्ट कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

बेंगळुरू विमानतळावर 55 प्रवाशांना सोडून गेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांना विमानतळावर सोडून गेल्याप्रकरणी DGCA ने गो फर्स्ट एअरलाइनला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच गो फर्स्टच्या अकाउंटेबल मॅनेजरला कारणे दाखवा नोटीस बजावली की त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी कारवाई का केली जाऊ नये असे विचारले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गो एअरचे G8-116 बेंगळुरू - दिल्ली फ्लाइटने 9 जानेवारी रोजी 55 प्रवाशांना न घेता दिल्लीकडे उड्डाण केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रवाशांनी चेक इन आणि बोर्डिंग पास घेतले होते. त्यानंतरही संबंधित विमान यासर्वांना सोडून गेले होते.

या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी ट्विटरवर विमान कंपनीला जाब विचारला होता. तर काही जणांनी पंतप्रधान कार्यालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग केले होते. त्यानंतर DGCA कडून संबंधित विमान कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.