DGCAचा Air Indiaला दणका! 'ही' चूक पडली महागात; ठोठावला लाखोंचा दंड

एअर इंडिया आता टाटा ग्रुपकडं असून यामुळं टाटा कंपनीला नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे.
Air India
Air Indiagoogle
Updated on

नवी दिल्ली : डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं टाटा ग्रुपच्या एअर इंडियाला मोठा दंड ठोठावला आहे. एअर इंडियाला एक चूक चांगलीच महागात पडली आहे.

DGCA नं या विमान कंपनीला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भातील डीजीसीएनं एक निवेदनही प्रसिद्ध केलं आहे. (DGCA imposes Rs 10 lakh fine on Air India for violation of DGCA Civil Aviation Requirement)

Air India
Chhattisgarh Election: नक्षलवाद्यांनी मतदान केंद्र खरंच घेतलंय ताब्यात? मतदानाची काय आहे स्थिती?

काय आहे नियम?

DGCAनं म्हटलं की, विमान प्रवाशांचे हक्कांचं संरक्षण करणं आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतीनुसार भारतातील एअरलाइन्स सुसंगत पद्धतीनं चालावीत याची आम्ही खात्री बाळगतो. त्यानुसार, डीजीसीएनं सन 2010 मध्ये CAR विभाग 3, मालिका M भाग IV प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार, उड्डाणांमध्ये येणारे अडथळे आणि विशेषतः नाकारलेल्या बोर्डिंग, फ्लाइट रद्द करणे आणि विलंब झाल्यास हवाई प्रवाशांसाठी योग्य संरक्षण देणं याचा यामध्ये समावेश आहे. (Latest Marathi News)

कारणे दाखवा नोटीस

प्रवासी-केंद्रीत नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी, DGCA नं मे 2023 पासून सतत विविध प्रमुख विमानतळांवर नियोजित देशांतर्गत विमान कंपन्यांची तपासणी केली. एअरलाइन्सच्या तपासणीदरम्यान, एअर इंडिया संबंधित CARच्या तरतुदींचं पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यानुसार, कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. CARच्या तरतुदींचं पालन न केल्याबद्दल एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

Air India
''शिंदे समितीला आमचा टोकाचा विरोध, त्यांना घटनात्मक अधिकार नाही'' ओबीसी नेत्यांची फडणवीसांसोबतची बैठक संपली

लाखो रुपयांचा दंड

हे लक्षात घेतलं पाहिजे की, यापूर्वी गेल्या वर्षीही प्रमुख विमानतळांवर अशाच प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या होत्या आणि एअर इंडियाने प्रवाशांच्या नाकारलेल्या बोर्डिंगवर CARच्या तरतुदींचं पालन न केल्यामुळं लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यानुसारच, नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियावर 10,00,000/- दंड आकारण्यात आला आहे, असं DGCAनं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.