गुवाहाटीत इंडीगो फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग; केंद्रीय मंत्र्यासह २ भाजप आमदार करत होते प्रवास

Indigo Airlines
Indigo Airlinesesakal
Updated on

आसाममधील गुवाहाटीमधून दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो विमानचे इमर्जन्सी लँडीग करावा लागले. विमानाच्या पायलटने इंजिनमध्ये समस्या असल्याचे जाहीर केल्यानंतर गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणते या 6E22652 फ्लाइटमध्ये केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री आणि भाजपचे दोन अमदार देखील प्रवास करत होते.

गुवाहाटीकडे वळवण्यापूर्वी दिब्रुगड विमानतळावर विमान 15 ते 20 मिनिटे हवेतच राहिले. त्यानंतर अखेर गुवाहाटी विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासह 150 हून अधिक प्रवासी विमानात प्रवास करत होते.

Indigo Airlines
FDC Drugs Ban : खोकला, तापावरील १४ औषधांवर सरकारची बंदी! 'येथे' पाहा धोकादायक औषधांची यादी

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले, मी भाजप आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासोबत इंडिगोच्या फ्लाइटमध्ये होतो. गुवाहाटीकडे वळवण्यापूर्वी दिब्रुगड विमानतळावर विमान 15 ते 20 मिनिटे हवेतच राहिले. दरम्यान विमानाचे लँडिंग झाल्याने मोठा अनर्थ टळला,

Indigo Airlines
Odisha Train Accident : २८८ मृत्यू तर ११०० जखमी; समोर आलं भीषण अपघाताचे कारण, रेल्वेमंत्री म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.