दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत 'हा' आहे मुख्य फरक; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

Corona
Corona sakal
Updated on

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry ) आज गुरुवारी कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तुलना करत फरक स्पष्ट केला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील मृत्यू आणि लसीकरणाची व्याप्ती यामधील असलेला मोठा फरक देखील त्यांनी स्पष्ट करुन सांगितला आहे. हे सांगत असताना आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला देशातील साथीच्या (Covid-19 pandemic) रोगाची तिसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. (Third Wave of the Pandemic )

Corona
अनिल देशमुखांची कोठडी संपेना! आणखी १४ दिवसांची वाढ

1. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान ही दैनंदिन प्रकरणांमधील वाढीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारी राज्ये आहेत.

2. 19 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, भारतात 515 जिल्हे असे आहेत ज्यात साप्ताहिक केस पॉझिटिव्हीटी ही 5% पेक्षा जास्त आहेत.

3. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 30 एप्रिल 2021 रोजी सांगितलं होतं की, जेव्हा देशात दुसरी लाट टीपेला होती, तेव्हा 3,86,452 नवीन प्रकरणे, 3,059 मृत्यू आणि 31,70,228 सक्रिय प्रकरणे होती तर पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांचे प्रमाण 2% होते.

4. तर आज 20 जानेवारी 2022 रोजी, देशात 3,17,532 नवीन प्रकरणे आहेत तर 380 मृत्यू आणि 19,24,051 सक्रिय प्रकरणे आहेत. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांचे प्रमाण 72% आहे.

Corona
Australian Open: सानिया मिर्झा - राजीव रामचा मिश्र दुहेरीत सहज विजय

5. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितलंय की, लसीकरणाच्या व्याप्तीमुळेच भारतातील तिसरी लाट तितकीशी तीव्र भासत नाहीये, जितकी दुसरी लाट ठरली होती.

6. निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल म्हणाले की, भारतासाठी एकूण पॉझिटीव्हीटी रेट 16% हा खूप जास्त आहे. ओमिक्रॉनमुळेच ही लाट आल्याचं डॉ. पॉल यांनी म्हटलंय.

7. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील कोविडच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या लाटेची तुलना देखील सादर केली. यामध्ये 3ऱ्या लाटेदरम्यान व्यापलेल्या कोविड बेडची संख्या ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असल्याचं दर्शवत आहे.

8. देशात पुरेशा प्रमाणात कोविड-19 चाचण्या केल्या जात आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()