पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांच्यातील संबंध बिघडल्याच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी शनिवारी बैठक बोलावली आहे. दरम्यान प्रशांत किशोर यांची I-PAC आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या पुढे आल्यानंतर ही बैठक बोलवण्यात येत आहे. (differences between Mamata Banerjee and Prashant Kishor)
प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या शानदार विजयाचे रणनीतीकार होते. त्याच्या मर्गदर्शनातूनच तृणमुल कॉंग्रेसला विजय मिळवता आला. दरम्यान बंगालमध्ये होणार्या 108 नगरपालिका निवडणुकीसाठी (Bengal Municipal Election) उमेदवारांच्या यादीवरून सोमवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील (Trinamool Congress) मतभेद वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी सायंकाळी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) आणि पक्षाचे अध्यक्ष सुब्रत बक्षी (Subrata Bakshi) यांनी त्यांची स्वाक्षरी असलेली पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केल्यावर हा वाद सुरू झाला. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर उमेदवारांची स्वतंत्र यादी देखील दिसून आली. मात्र, त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती.
दोन्ही याद्या वेगवेगळ्या असल्याने राज्याच्या विविध भागांत आंदोलनं झाली. अनेक असंतुष्ट टीएमसी (TNC) कार्यकर्ते रस्त्यावर उतरून टायर जाळताना आणि घोषणाबाजी करताना दिसले. पार्थ चॅटर्जी आणि सुब्रता बक्षी यांनी जाहीर केलेली उमेदवारांची यादी अंतिम आहे, असं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.