आता झिकाने वाढवली देशाची चिंता, अनेक राज्यात विषाणूचे पुरावे

काही रुग्णांमध्ये झिका व्यतिरिक्त डेंग्यू आणि चिकुनगुनियाचाही संसर्ग दिसून येत आहे.
various state in india zika virus found by scientists
various state in india zika virus found by scientists
Updated on

झिका विषाणूच्या प्रसारासंदर्भात एका अभ्यासातून वैज्ञानिकांनी मोठा खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञांना देशातील अनेक राज्यांमध्ये झिका विषाणूच्या प्रसाराशी संबंधित पुरावे सापडले आहेत. या अभ्यासाआधारे शास्त्रज्ञांकडून राज्यांना तत्काळ संबंधित हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (various state in india zika virus found by scientists)

नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अंतर्गत देशातील विविध केंद्रांना झिका विषाणू देशाच्या काही भागांमध्ये आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. या संसर्गासोबत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचेही प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

काही रुग्णांमध्ये झिका व्यतिरिक्त डेंग्यू आणि चिकुनगुनियाचाही संसर्ग दिसून येत आहे. यासंबंधित रुग्णांची तपासणी केली असता या रुग्णांना दुय्यम संसर्ग असल्याचे समोर आले आहे. मात्र यावर अजून कोणातही ठोस पुरावा मिळालेला नाही. एका वैद्यकीय मासिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी म्हटलंय की, अलिकडच्या काळात भारतात झिका विषाणूची स्थिती गंभीर दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विविध राज्यांतूनही अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

various state in india zika virus found by scientists
'जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते उद्धव ठाकरेंचं सरकार वाचवायला निघालेत'

आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागली वर्षी मे ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान देशातील 13 राज्यांमधून 1475 रुग्णांचे नमुने गोळा केल्यानंतर ही तपासणी करण्यात आली होती. यादरम्यान 67 रुग्णांमध्ये झिका, 121 रुग्णांमध्ये डेंग्यू आणि 10 रुग्णांमध्ये चिकुनगुनियाची आढळत असल्याची माहिती मिळाली होती. झिका व्हायरसची सर्व प्रकरणे लक्षणात्मक होती.

various state in india zika virus found by scientists
By-polls: 3 लोकसभा आणि 7 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही संक्रमित नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली. तेव्हा असे आढळले की, रुग्णांमध्ये या विषाणूचा हा आशियाई प्रकार दिसून आला आहे. तसेच डेंग्यूचेही चार प्रकार आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.