काँग्रेसमध्ये गटबाजी, अंतर्गत कलह; महापौर म्हणाले, मोदींशी लढणे कठीण

Congress Party
Congress PartyCongress Party
Updated on

आम्ही ४० ते ४५ वर्षे राज्य केले. परंतु, आता आम्ही लाभार्थी झालो आहोत. ज्या काळात आम्ही सूत्रधार होतो, त्या काळात भाजप आमच्याकडून निवडणूक लढायचे शिकत होते. ते आता आम्हाला हरवायला शिकले. लाभार्थी झाल्यानंतर आपण इथे बसून काय घडले आणि कसे घडले हे सांगत आहो. भाजपला हटवण्याचा फॉर्म्युला आमच्याकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी लढणे कठीण झाले आहे, असे अभिजित कुमार म्हणाले.

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेला काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत कलह शनिवारी पुन्हा एकदा समोर आला. जिल्हा काँग्रेसने देशात डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींविरोधात निदर्शने केली व संप पुकारला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लढणे कठीण असल्याचे महापौर (congress mayor) अभिजित कुमार म्हणाले.

Congress Party
ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

ज्यांना तुम्ही केंद्र सरकारच्या अत्याचारामुळे त्रास झाल्याचे सांगत आहात, तेच लोक त्यांना मतदान करीत आहेत. जनतेला कळत नाही असे नाही. जनतेला सर्व काही माहीत आहे. परंतु, तुम्हाला कसे समजावायचे हे जनतेला कळत नाही. जेव्हा ते तुम्हाला उन्हात आणि संघर्षात पाहतात तेव्हाच लोकांना समजते. तुम्ही कोणासाठी लढत आहात हे जनतेला कळायला हवे, असेही अभिजित कुमार म्हणाले.

काय अपेक्षा करायची?

पोट भरण्यासाठी रेशन घेऊन जा, असे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनतेला सांगितले. आता आमच्या आणि त्यांच्या धोरणातील फरक समजावून सांगावा लागेल. आता तीच अवस्था राज्य सरकारांची होणार आहे. ज्या पक्षाशी लढायचे आहे, तो पन्नाप्रमुखही बनवतो आणि काँग्रेसचा जिल्हाध्यक्षही झाला नाही, तर काय अपेक्षा करायची?, असेही अभिजित कुमार (congress mayor) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()