Online Satbara : ऑनलाईन सातबारा सेवा बंद! शेतकऱ्यांचे होतायेत हाल

त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
Online Satbara
Online SatbaraSakal
Updated on

शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं वृत्त अॅग्रोवनने दिलं आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

दरम्यान, विविध शासकीय आणि इतर शेतीच्या विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ - अ उताराची गरज असते. तर शेतकऱ्यांचे काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती. पण ही सेवा सध्या बंद करण्यात आली आहे.

Online Satbara
Pakistan Crisis : पिठासाठी पाकिस्तानी जनता रस्त्यावर अन् मोदींचा 'तो' Video Viral

ऑनलाईन उतारे बंद तर झालेच आहेत पण तलाठी कार्यालयेसुद्धा मागच्या काही दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी शेतकरी करू लागले आहेत. तर तलाठ्याकडून स्वाक्षरीचा सातबारा काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरीची सेवा कोणत्यातरी तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली असावी, यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ती पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.