Digital Strike By India : ३४८ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी; चिनी ॲप्सचा समावेश

राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली
Mobile Apps Banned News
Mobile Apps Banned NewsMobile Apps Banned News
Updated on

नवी दिल्ली : Mobile Apps Banned बीजीएमआय गेमनंतर आता भारत सरकारने ३५० मोबाईल ॲप्स ब्लॉक केले आहेत. एका अहवालानुसार, भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये बनविलेले ३४८ मोबाइल ॲप्स ब्लॉक (Mobile Apps Banned) केले आहेत. या ॲपनी वापरकर्त्याचे तपशील गोळा केले आहेत आणि ते अनधिकृतपणे परदेशात प्रसारित केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत भाजपच्या रोडमल नगरच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

हे ३४८ मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरकर्त्यांची माहिती गोळा करीत होते. तसेच अनधिकृत प्रोफाइलिंगसाठी देशाबाहेरील सर्व्हरांपर्यंत पोहोचवत होते. एमएचएच्या विनंतीच्या आधारे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ३४८ मोबाईल (Mobile) ॲप्लिकेशन्सना ब्लॉक (Banned) केले आहे. असे डेटा ट्रान्समिशन भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे, भारताच्या संरक्षणाचे आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन करते, असे चंद्रशेखर म्हणाले.

Mobile Apps Banned News
Money Laundering Act : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भयानक - विरोधी पक्ष

दक्षिण कोरियन गेमिंग दिग्गज क्राफ्टनने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यानंतर काही दिवसांनी सरकारचा हा निर्णय आला आहे. गुगलने यासंदर्भात सरकारकडून आदेश प्राप्त करून ॲपवर प्रवेश अवरोधीत केल्याचे सांगितले होते. ही सर्व ॲप्स चीनने (China) विकसित केली आहेत का? असे विचारले असता चंद्रशेखर म्हणाले, हे ॲप्स चीनसह विविध देशांनी विकसित केले आहेत.

सप्टेंबर २०२० मध्ये डेटा सुरक्षेच्या कारणास्तवरून पब्जीला ११७ इतर चीन-लिंक ॲप्ससह ब्लॉक केले होते. वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षेच्या कारणास्तव माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९A अंतर्गत १४ फेब्रुवारी रोजी बॅटल रॉयल गेम फ्री फायरसह ५३ अन्य चीनशी संबंधित ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()