Dilip Kumar : ‘ट्रॅजडी किंग’चे घर कोसळण्याच्या मार्गावर

पेशावरमधील मुसळधार पावसाने हानी; दुरुस्तीबाबत सरकारची अनास्था
Dilip Kumar
Dilip Kumaresakal
Updated on

पेशावर : ज्येष्ठ अभिनेते दिवंगत दिलीप कुमार यांचे पाकिस्तानच्या पेशावर येथील वडिलोपार्जित घराची नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड हानी झाली असून ते कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. दिलीपकुमार यांच्या घराला पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून म्हणून जाहीर केले असले तरी त्याच्या दुरुस्तीबाबत आणि नूतनीकरणाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dilip Kumar
Fashion Tips : साडीमध्ये मॉडर्न दिसायचयं? मग, 'या' टिप्स फॉलो करून, मिळवा स्टायलिश लूक

खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात दोन आठवड्यापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दिलीपकुमार यांच्या घराचे पुनर्वसन आणि नुतनीकरणासंदर्भात खैबर पख्तुन्ख्वा पुरातत्त्व विभागाने केलेले दावे पोकळ ठरले आहेत. दिलीपकुमार यांचा जन्म १९२२ रोजी याच घरात झाला होता. पेशावरच्या ऐतिहासिक किस्सा ख्वानी बाझारच्या मागील बाजूस असलेल्या मोहल्ला खुदादाद येथे दिलीपकुमार यांचे घर आहे. १९३२ च्या सुमारास पेशावर शहर सोडण्यापूर्वी दिलीपकुमार यांनी या घरात दहा ते बारा वर्षे व्यतीत केले.

Dilip Kumar
Kitchen Tips : ही ट्रिक वापराल तर पाच तासात लागेल दही, फक्त या चूका करू नका

दिलीपकुमार यांच्या वडिलोपार्जित घराला १३ जुलै २०१४ रोजी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून जाहीर केले होते. दिलीपकुमार यांनी पेशावर भेटीत घराला भेट दिली तेव्हा ते भावुक झाले हेाते. खैबर पख्तुनख्न्वा प्रांताच्या वारसा परिषदेचे सचिव शकील वाहिदुल्लाह खान म्हणाले, पेशावरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलीपकुमार यांच्या घराची प्रचंड हानी झाली आहे. यापूर्वीच्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांताच्या सरकारने बऱ्याचदा निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात त्यावर एक रुपयाही खर्च केला नाही. हे घर १८८० रोजी बांधल्याचे सांगितले जाते. दिलीपकुमार यांचे घर जीर्ण झाले असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असे खान म्हणाले.

Dilip Kumar
Tanning Removal Tips : पायांवरील टॅनिंग जात नाहीये? मग,'या' सोप्या उपायांच्या मदतीने पायांचे सौंदर्य परत मिळवा

या ऐतिहासिक घराची हानी झाल्याबद्दल स्थानिक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त करताना सरकारच्या उदासिनतेबाबत नाराजी व्यक्त केली. पुरातत्त्व खात्याचे दावे कागदोपत्रीच असून प्रत्यक्षात नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही उपाय केलेल्या नाहीत, असा आरोप केला. दिलीपकुमार यांचे घर पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गर्दी करतात.मात्र या घराची दुरवस्था पाहून त्यांची निराशा होते. पुरातत्त्व विभागाने हे घर ताब्यात घेण्यापूर्वी दिलीपकुमार यांच्या घराची मालकी मोहंमद अली मीर यांच्याकडे होती. ते म्हणाले, आपल्याकडे घराची मालकी असताना त्याला चांगल्या रीतीने सांभाळले होते.

Dilip Kumar
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

मात्र पुरातत्त्व विभागाकडे घर गेल्यानंतर या घराची दुरवस्था झाली. त्याचे पुनर्वसन आणि नूतनीकरण करण्याच्या घोषणा केवळ वर्तमानपत्रापुरतीच मर्यादित राहिल्या. आजघडीला दिलीपकुमार यांचे घर भूतबंगला झाले आहे, असे ते म्हणाले. दिलीपकुमार यांचा मृत्यू ७ जुलै २०२१ रोजी मुंबईत वयाच्या ९८ व्या वर्षी झाला. पेशावर शहराबद्दल त्यांच्या मनात मोठे स्थान होते आणि बालपणीच्या आठवणींना नेहमी उजाळा देत असत. पाकिस्तान सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान ए इम्तियाज ’ सन्मान १९९७ रोजी जाहीर केला होता.

‘‘दिलीपकुमार यांच्या मनात पेशावरच्या लोकांवर नितांत प्रेम आणि सन्मान होता. दुर्देवाने पुरातत्त्व खात्याने त्यांच्या घराच्या संरक्षणासाठी काहीच केले नाही आणि ते घर आता कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. ’’

- मोहंमद अली मीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.