अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मैनपुरीमधून समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून लढत होत्या. येथे डिंपल यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आणि उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग उभे केले होते. मात्र, यामध्ये डिंपल यादव यांनी बाजी मारली आहे. त्यांनी 210808 मतांनी विजय मिळवला. तर कन्नौज मतदारसंघातून अखिलेशही एक लाख मतांनी पुढे आहेत.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघ हा मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. ही जागा यापूर्वी मुलायम सिंह यांच्याकडे होती. 2019 आणि 2014 मध्ये त्यांनी मैनपुरीमधून लोकसभा निवडणूक जिंकली. 10 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली.
नंतर, डिंपल यादव यांनी डिसेंबर 2022 मध्ये मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या रघुराज सिंह शाक्य यांचा 2,88,461 मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघात मैनपुरी, भोनगाव, किशानी, कर्हाळ, जसवंतनगर यासह 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात सपा, भाजप हे प्रमुख पक्ष आहेत.
जसवंतनगर हा अखिलेश यांचे चुलते शिवपाल यादव यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त भोनगाव ही जागा भारतीय जनता पक्षाकडे गेली, तर उर्वरित सर्व 4 जागा सपाने जिंकल्या होत्या.
2022 च्या विधान सभा निवडणुकीत येथे मैनपुरी, भोनगाव या जागा भाजपने जिंकल्या होत्या तर उर्वरीत 3 जागांवर समाजवादी पक्षाने बाजी मारली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपाचे मुलायम सिंह यादव यांनी 94,389 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यांना 54.00% मतांसह 524,926 मते मिळाली होती. त्यांनी भाजपच्या प्रेमसिंग शाक्य यांचा पराभव केला, ज्यांना 430,537 मते (44.01%) मिळाली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांनीच ही जागा जिंकली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलायम सिंह यादव यांना 59.63% मतांसह 595,918 मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिंह चौहान यांना 231,252 मते (23.14%) मिळाली होती. मुलायम सिंह यादव यांनी शत्रुघ्न सिंह चौहान यांचा 364,666 मतांनी पराभव केला.
समाजवादी पक्षाचे सरकारने यापूर्वी केलेली कामेच मैनपुरीमध्ये दिसत आहेत. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्ग असो, जीटी रोडचा चौपदरीकरण प्रकल्प असो किंवा भोगाव-शिकोहाबाद रस्त्याचा चौपदरीकरण प्रकल्प असो, सर्व सपा सरकारचे योगदान आहे.
भाजपचे सरकार आल्यानंतर चौपदरीकरणाच्या दोन्ही प्रकल्पांची कामे मंदावली होती, मात्र, गेल्या सहा महिन्यांत या प्रकल्पांना गती मिळाली आहे.
आरोग्य सेवेच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा राज्य सरकारकडे कॅन्सर युनिट सुरू करण्याची मागणी लावून धरली, मात्र काहीही होऊ शकले नाही. मात्र, येथे प्रधानमंत्री गरीब आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य आदी योजना सुरळीत सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.