Diwali 2024: एक शापित गाव! जिथे कोणीही दिवाळी साजरी करीत नाही, घरात कैद करून घेतात लोक
Haryana Latest News: गावाला श्राप असल्याची गावकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे दिपावलीमध्ये कुठलाही जल्लोष गावात केला जात नाही. जर कुणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केलाच तर आकस्मिक संकट येतं आणि त्यातच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, असं म्हटलं जातं.
नवी दिल्लीः सध्या देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. लोक दिवाळीच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत. दिवाळीनिमित्त गुरूवारी देशातला कोनाकोपरा कोट्यवधी दिव्यांनी उजळून निघेन. परंतू देशात एक गाव असं आहे, जिथे दिवाळी साजरीच केली जात नाही.