Disaster Management : बचावासाठी पथक अधिक सुसज्ज असणे गरजेचे - अतुल करवाल

‘एनडीआरएफ’चे महासंचालक अतुल करवाल यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला
cyclone weather update ndrf team needs to better equipped for rescue Atul Karwal
cyclone weather update ndrf team needs to better equipped for rescue Atul Karwalesakal
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रालगतच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता व पावसामुळे मुंबईसह अनेक शहरात येणाऱ्या पुरामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्रात बचाव कार्यासाठी अधिक सुसज्ज राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची (एसडीआरएफ) आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक अतुल करवाल यांनी दिली.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ‘एनडीआरएफ’ने यशस्वी कामगिरी केल्यामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही व गुजरातमध्ये मालमत्तांचे नुकसानही कमी झाले. या पार्श्वभूमीवर बोलताना महासंचालक करवाल म्हणाले, की नैसर्गिक संकट सांगून येत नाही परंतु आता तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे या संकटाची तीव्रता किती राहू शकते व त्यावर उपाययोजना करण्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल, याचा एक प्राथमिक अंदाज येतो.

गेल्या १७ वर्षांमध्ये एनडीआरएफने एक मोठी दमदार जवानांची फौज निर्माण केली आहे. देशातील १६ ठिकाणी ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या आहेत. यात महाराष्ट्रात पुण्यात एक तुकडी आहे व मुंबईत एक त्वरित मदत करण्यासाठी एक केंद्र आहे.महाराष्ट्राला मोठी किनारपट्टी लाभली आहे. या भागाला चक्रीवादळाचा धोका आहे. शिवाय मुंबईसह अनेक महानगरात पुराच्या संकटाचे अधिक धोके निर्माण झाले आहेत.

cyclone weather update ndrf team needs to better equipped for rescue Atul Karwal
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाने घेतला पिता-पुत्रांचा जीव; 22 जण जखमी

दरवर्षी मुंबईप्रमाणेच अन्य शहरांना पुराचा सामना करावा लागतो. हे संकट बहुतांश अनियोजित शहरांच्या विस्तारामुळे झालेले असते. यावर महाराष्ट्र सरकारला लक्ष द्यावे लागेल. पण या संकटाच्या काळात लोकांना बचाव करण्यासाठी मदत व मालमत्तांचे नुकसान कमी होईल, याची खबरदारी घेण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य आपत्ती व्यवस्थापन दल (एसडीआरएफ) पुरेसे बळकट नाही. यामुळे महाराष्ट्र सरकारला निश्चितपणे लक्ष घालावे लागेल. आपत्ती व्यवस्थापन करण्यात जी १२ राज्ये पिछाडीवर आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे, असेही करवाल यांनी स्पष्ट केले.

cyclone weather update ndrf team needs to better equipped for rescue Atul Karwal
Cyclone Biparjoy : सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातेत मुसळधार; अमित शहांकडून हवाई पाहणी

‘बिपरजॉय’मध्ये एकही मृत्यू नाही

बिपरजॉयच्या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीबद्दल माहिती देताना करवाल म्हणाले, नैसर्गिक संकटामुळे होणारी संभाव्य जिवीत आणि मालमत्ता हानी टाळण्यासाठी एका दिवसात तयारी करता येत नाही. धोक्याची सूचना मिळाल्यानंतर एनडीआरएफचे पथके सुसज्ज झाली.

गुजरात सरकारशी समन्वय साधत जागरूकता निर्माण करत नागरिकांना सुरक्षितस्थळी नेणे हे पहिले काम होते. यानुसार जवळपास सव्वा लाख लोकांना एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले. यात ११०० गर्भवती होत्या. त्याचबरोबर मालमत्तांचे नुकसान किती कमी होईल, याची काळजी जवानांनी घेतली. १९ तुकड्या तैनात केल्या होत्या.

पंतप्रधानांचे मार्गदर्शन

नैसर्गिक संकटांमध्ये लोकांना त्वरित मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच संवेदनशील राहतात, असे सांगून करवाल म्हणाले, की यावेळी त्यांनी स्वतः स्थिती समजून घेतली व वारंवार काय उपाययोजना कराव्यात याची माहिती जाणून घेतली. ‘एनडीआरएफ’ला अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारकडून कधीही निधीची कमतरता भासली नाही.

अशी ही कामगिरी

एनडीआरएफची स्थापना २००६ मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत दीड लाख लोकांचे प्राण वाचविले. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले.

cyclone weather update ndrf team needs to better equipped for rescue Atul Karwal
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकले; सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पाऊस; वीज खंडित

लोक शिक्षण मोलाचे

नैसर्गिक संकट आल्यानंतर स्थानिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी लोकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न ‘एनडीआरएफ’तर्फे केला जात आहे. पोलिस व राज्य सरकारच्या लोकांना यात सहभागी करून घेणे ‘एनडीआरएफ’चा प्रयत्न आहे.

बालासोरमध्ये दीड तासात पोचलो

काही दिवसांपूर्वी बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. तेथेही अवघ्या दीड तासात एनडीआरएफचे पथक पोहोचल्याची माहिती करवाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.