Praniti Shinde : ‘मराठा, धनगर आरक्षणासाठी चर्चा करा’

मराठा-धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकारने आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याशी बोलणी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आज लोकसभेत केली.
Praniti Shinde
Praniti Shindesakal
Updated on

मराठा-धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकारने आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याशी बोलणी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आज लोकसभेत केली.

लोकसभेमध्ये शून्य काळात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महिलांना आरक्षण मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याची देखील आग्रही मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे - पाटील हे उपोषणाला बसले आहेत.

तर धनगर समाजाचीही अनुसूचित जमातीत समावेश व्हावा अशी मागणी असल्याचे प्रणिती शिंदे यांचे म्हणणे होते. या दोन्हीही मुद्द्यांवरून राज्य सरकार तणावात भर घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

मराठा-धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने चर्चा करून या समस्येवर तोडगा काढावा, ही आपली मागणी असल्याचे खासदार शिंदे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.