संसदेचे अधिवेशन
संसदेचे अधिवेशन sakal

संसदेचे अधिवेशन गुंडाळण्याची चर्चा

महत्त्वाच्या विधेयकांसाठी सरकारची मोर्चेबांधणी
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील चार पैकी तीन आठवडे गदारोळाने पाण्यात गेले असून आता मुदतीपूर्वीच अधिवेशन गुंडाळण्याची चर्चा सत्तारूढ गोटात सुरु आहे. महत्त्वाची विधेयके राज्यसभेत गोंधळात किंवा विरोधकांनी सभात्याग केल्यावर मंजूर करवून घेतली की सोमवारी किंवा मंगळवारी अधिवेशनाचे सूप वाजण्याच्या हालचाली आहेत.केंद्रातील क्रमांक दोनच्या गृहखात्याचे वादग्रस्त राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना काढण्यासाठीही सरकारने अधिवेशन समाप्तीचा मुहूर्त काढल्याचे समजते.

अधिवेशन संपताच स्वतः पद सोडण्याचे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे संकेत भाजप वर्तुळात मिळाले. काहीही करून हा विषय संसदेत आणखी तापू द्यायचा नाही असा निर्धार सरकारने केला आहे. आवश्यक ती एक-दोन विधेयके मंजूर झाल्यावर राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा करायची व तत्काळ अधिवेशनही संस्थगित केल्याचे जाहीर करायचे अशा अंतस्थ पण निश्चित हालचाली आहेत. यादरम्यान राज्यसभेतील एका बड्या नेत्याच्या निवासस्थानी विवाह समारंभ आहे. या विवाहास सर्व खासदारांनी उपस्थित राहावे अशी इच्छा असलेल्या या नेत्याने सर्व खासदारांना लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्यांच्या मातृभाषेत पाठविल्याची माहिती आहे.

प्रतिरूप संसदेत चर्चा अन् ठराव

निलंबित १२ सदस्यांसह विरोधी नेत्यांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रतिरूप संसद'' भरविली. तेथे घोषणा देण्यात आल्या. एमएसपी कायदा, कोरोना या विषयावरील चर्चा होती व मंत्री टेनी यांच्याविरोधातील ठरावही होता. यावेळी लोकसभा-राज्यसभेतील विरोधी खासदारांची मोठी उपस्थिती होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, सभागृहात मला बोलूही दिले जात नाही असा आरोप केला. अध्यक्ष येतात व दोन सेकांदांत कामकाज तहकूब करून निघून जातात, याबद्दल खर्गे यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली. लखीमपूर खेरीचे शेतकरी हत्याकांड व या हत्या करणारा मंत्री मिश्रा याचा राजीनामा हा निश्चित मोठा मुद्दा आहे असेही ते म्हणाले.

देशाच्या पक्षांचे गल्लीतील पक्षांत रूपांतर म्हणजे ही प्रतिरूप संसद आहे. हे संसदेत येणार नाहीत, आले तर संसदेची प्रतिष्ठा धुळीला मिळविणार व बाहेर बसून प्रतीसंसद भरविणार, ही सारी लोकशाहीची थट्टा आहे.

- मुख्तार अब्बास नक्वी,केंद्रीय मंत्री

आमचे लोकशाही हक्क संसदेत नाकारल्याने येथे प्रतिरूप संसद भरवावी लागली

- डोला सेन, तृणमूलच्या खासदार

माझा निलंबित खासदारांमध्ये समावेश नाही, मात्र झालेला अन्याय मांडण्यासाठी आपण सभागृहात न जाता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी आलो.

- नदीम उल हक, तृणमूलचे खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()