Loksabha Election: घटस्फोट घेतला अन् आता पती-पत्नी लोकसभा निवडणुकीत समोरासमोर; एक भाजपकडून तर दुसरा तृणमूलकडून

Loksabha election 2024: तृणमूलने उमेदवारांची घोषणा करताच एक खास गोष्ट घडून आली आहे. पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणुकीत घटस्फोट घेतलेले पती-पत्नी समोरासमोर आले आहेत.
Divorced husband and wife
Divorced husband and wifeesakal
Updated on

कोलकाता- लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) रविवारी तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सर्व ४२ जागांवर तृणमूल एकट्याने निवडणूक लढवणार आहे. तृणमूलने उमेदवारांची घोषणा करताच एक खास गोष्ट घडून आली आहे. पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणुकीत घटस्फोट घेतलेले पती-पत्नी समोरासमोर आले आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या यादीमध्ये सुजाता मंडल यांच्या नावाचा देखील समावेश आहे. सुजाता या विभक्त पती सौमित्र खान यांच्या विरोधात बांकुडा जिल्ह्यातील बिश्रुपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे माजी पती-पत्नी एकमेकांविरोधात प्रचार करताना पाहायला मिळणार आहेत. तसेच एकमेकांचा पराभव करण्यासाठी ते शड्डू ठोकणार आहेत. (Divorced husband and wife face to face in Loksabha election 2024)

Divorced husband and wife
Loksabha Election : विनायकराव पाटील यांच्यासह एक हजार मराठे नरेंद्र मोदींच्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार!

सौमित्र खान यांना भारतीय जनता पक्षाने बिश्रुपूर मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. तर, रविवारी तृणमूलने याच जागेवरुन सुजाता मंडल यांना मैदानात उतरवलं आहे. राज्यात २०२१ च्या विधानसभा निवडणुकीआधी या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. ज्यावेळी सुजाता या तृणमूलमध्ये सहभागी झाल्या होत्या, त्याचवेळी सौमित्र खान यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांना घटस्फोट दिला होता.

सौमित्र खान यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नी सुजाता यांनी त्यांचा प्रचार केला होता. मात्र, आता विभक्त पती-पत्नी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तृणमूल काँग्रेसने ही मोठी खेळी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुकीत कोणाचा विजय होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Divorced husband and wife
Ramtek Loksabha: रामटेक मतदारसंघात भाजप लढणार? शिवसेनेने आग्रह सोडला, उमेदवारांची चाचपणी

ममतांचा पश्चिम बंगालमध्ये 'एकला चलो'

तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीसोबत जाईल अशी आशा शेवटपर्यंत व्यक्त केली जात होती. पण, अखेर ममतांनी सर्व जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करुन शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. तृणमूल काँग्रेसने विद्यमान आठ खासदारांना बाजूला केलं आहे.

माजी क्रिकेटपटू यूसुफ पठाण, कीर्ती आझाद अशा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यूसुफ पठाण यांना बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी असणार आहेत. नुजरत जहाँ यांचे तिकीट कापण्यात आले आहे. दुसरीकडे, संसदेतून काढून टाकण्यात आलेल्या खासदार महुआ मोईत्रा यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.