धजदचा एकही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नाही, तर उलट काँग्रेसचे ४० हून अधिक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोटही माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला.
बंगळूर : कर्नाटकात (Karnataka Politics) दिवाळीपूर्वीच सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकविण्यासाठी, तर विरोधकांना सत्ता खेचण्यावरून ‘शाब्दिक बाण’ एकमेकांवर सोडण्यास सुरुवात केली आहे. इतर पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवून दिवाळीपूर्वीच काँग्रेसने (Congress) सत्ता भक्कम कारण्याचे, तर विरोधकांनी ती मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता दिवाळीपूर्वीच राजकीय आतषबाजी अनुभवत आहे.
दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरला धजद-भाजपचे काही आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील, असे स्फोटक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी आज दिल्लीत केले. दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतील. भाजप आणि धजदचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. १५ नोव्हेंबरला आमच्या पक्षात आणखी नेते सामील होतील, असे सांगून त्यांनी ‘ऑपरेशन हस्त’चे संकेत दिले.
ते म्हणाले, ‘‘राज्यातील सध्याच्या परिस्थितीत भाजप आमच्या एका आमदारालाही फोडू शकत नाही. भाजपला नेतृत्वाबाबतही कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपमध्येच अनेक समस्या आहेत. आणि आमच्या आमदारांना फोडणे तर दूरच आहे. भाजपला अस्तित्वसाठी झगडत आहे. महाराष्ट्रात झालेल्या बैठकीबद्दल बोलत नाही. सर्वकाही माहीत आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेबाबत ते म्हणाले की, पंतप्रधानांना आमची आठवण येते, याचा आनंद आहे. आमची हमी, आमची एकजूट, जनतेच्या निर्णयाने त्यांची झोप उडाली आहे. ते आमच्याही स्मरणात राहतील, अशी टीका त्यांनी केली.
‘ऑपरेशन हस्त’मध्ये आमचा पक्ष सहभागी नाही, असे ठासून सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, भाजप आणि धजदचे अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात स्वेच्छेने काँग्रेसमध्ये येतील. सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता भाजप आणि धजदमधील आमदार, माजी आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह अनेकजण काँग्रेसमध्ये येत आहेत.
धजदचा एकही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नाही, तर उलट काँग्रेसचे ४० हून अधिक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोटही धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी केला. ते म्हणाले, ‘‘आम्ही सगळे एका कुटुंबासारखे आहोत. काँग्रेसच्या आमिषासाठी कोणीही पक्ष सोडणार नाही.
काही आमदार पक्ष सोडतील, हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही सर्व आमदारांची बैठक घेतली. आमच्या एकाही आमदाराने पक्ष सोडलेला नाही. आमच्या आमदारांबद्दल शंका नाही. हासन येथे हसनंबे देवीची जत्रा सुरु असल्याने आम्ही देवीचे दर्शन घेऊन येथेच सभा घेण्याचे ठरवले. आम्ही आज सर्व आमदारांची मते जाणून घेतली. सर्व आमदार एकत्र आहेत.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.