D. K. Shivakumar: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी शिवकुमारांनी घेतला पवारांचा आशीर्वाद, झुकून पडले पाया!

D. K. Shivakumar
D. K. Shivakumar
Updated on

डी.के. शिवकुमार यांनी आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या समारंभात राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना शपथ दिली.

शपथ घेण्यापूर्वी डी.के. शिवकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाया पडल्या. त्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. डी.के. शिवकुमार यांनी व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आशिर्वाद घेतले.

डी के शिवकुमार यांचे शपथ घेण्यासाठी नावाची घोषणा झाली. त्यावेळी ते सर्वांना नमस्कार करत होते. शरद पवार खुर्चीवर बसले होते. यावेळी शिवकुमार यांनी वाकून पवारांचे आशीर्वाद घेतले.

D. K. Shivakumar
Karnataka CM : शपथविधीच्या दोनच तासात होणार निवडणुकीतील आश्वासन पूर्ण! राहुल गांधीची धडाकेबाज घोषणा

शपथवीधी समारंभात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी. राजा हे नेते उपस्थित होते.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना काँग्रेसचे तारणहार म्हटल्या जाते. कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयात त्यांचे मोठे श्रेय मानल्या जाते. सलग ८ वेळा डी के शिवकुमार आमदार म्हणून निवडून आले आहेत.

D. K. Shivakumar
2000 Rupees Note: दोन हजारच्या नोटेवरुन कपिल सिब्बलांचे ट्विट चर्चेत; म्हणाले, मोदींनी भ्रष्टाचार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.