DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

G Devaraje Gowda: "जेव्हा मी त्यांच्या योजनांचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला अत्याचाराच्या प्रकरणात गोवले, परंतु नंतर कोणताही पुरावा सापडला नाही."
G Devaraje Gowda And DK Shivkumar
G Devaraje Gowda And DK ShivkumarEsakal
Updated on

कर्नाटकचे भाजप नेते जी देवराज गौडा यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी 100 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा भाजपचे देवराजे गौडा यांनीकेला आहे.

देवराज गौडा यांना नुकतीच एका लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली होती. शनिवारी देवेगौडा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती, त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना देवेगौडा यांनी मोठा दावा केला आहे.

एआयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर एका पोलिस वाहनात माध्यमांशी संवाद साधताना देवराज गौडा यांनी दावा केला की, शिवकुमार यांनी त्यांना बंगळुरूमधील 110 क्रमांकाच्या खोलीत एडव्हान्स म्हणून 5 कोटी रुपये पाठवले होते.

मी ही ऑफर नाकारल्याचे देवराज गौडा यांनी सांगितले. सुटकेनंतर मी त्यांचा (डीके शिवकुमार) पर्दाफाश करेन. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पडणार आहे. डीके शिवकुमार यांना पंतप्रधान मोदींची प्रतिमा डागाळायची आहे, असा दावा भाजप नेत्याने केला.

G Devaraje Gowda And DK Shivkumar
RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

देवराज गौडा म्हणाले, “कुमारस्वामी यांनी लैंगिक छळाशी संबंधित व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह प्रसारित केले," असे विधान करण्यास मला सांगण्यात आले होते.

देवराजे गौडा यांनी पुढे दावा केला की, "चन्नरायपटना येथील स्थानिक नेते गोपालस्वामी यांना हे डिल करण्यासाठी माझ्याकजे पाठवण्यात आले होते."

G Devaraje Gowda And DK Shivkumar
भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

देवराजे गौडा म्हणाले, "शिवकुमार यांचा मुख्य उद्देश कुमारस्वामींना राजकीयदृष्ट्या संपवणे आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, "जेव्हा मी त्यांच्या योजनांचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला अत्याचाराच्या प्रकरणात गोवले, परंतु नंतर कोणताही पुरावा सापडला नाही. माझ्यावरील लैंगिक छळाचा खटलाही अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी माझ्यावर नवा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.