Lok sabha election 2024 : ''...तर पुदुच्चेरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणार'', नेमकं काय म्हणाले एमके स्टॅलिन?

पुदुच्चेरीमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याबद्दलही स्टॅलिन यांनी चिंता व्यक्त केली. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास पुदुच्चेरीचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
Lok sabha election 2024
Lok sabha election 2024 esakal
Updated on

पुदुच्चेरी : इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास पुदुच्चेरीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी रविवारी येथील जाहीर सभेत दिले. जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आला असून येथील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टॅलिन यांनी सभा घेतली.

सभेतील उपस्थितांसमोर स्टॅलिन म्हणाले,‘‘पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी हे केंद्राच्या हातातले बाहुले आहेत. तमिळनाडूसारख्या मोठ्या राज्याचेच नाही तर, पुदुच्चेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशाचेही हक्क जपले गेले पाहिजेत, असे आमचे आहे.

Lok sabha election 2024
West Bengal Police: ममता विरुद्ध मोदी वाद टोकाला, प. बंगालमध्ये थेट NIA अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

त्यामुळेच सत्तेत आल्यास पुदुच्चेरीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत आहे. भाजपच्या देशातील दहा वर्षांच्या सत्ताकाळात पुदुच्चेरीला काहीही मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ धर्म आणि जातीच्या आधारावर प्रचार करत आहेत. अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी काहीही भरीव काम केलेले नाही. तमिळनाडूच्या मच्छीमारांना श्रीलंकेचे सैनिक वारंवार पकडत असले तरी याबाबतही मोदींनी काही केलेले नाही.’’

Lok sabha election 2024
Govinda: गोविंदाची भाची 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; मुंबईतील व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ

पुदुच्चेरीमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याबद्दलही स्टॅलिन यांनी चिंता व्यक्त केली. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास पुदुच्चेरीचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.