'तुम्ही संसदेत कशासाठी आलात?; CISF च्या जवानाने थेट खासदारालाच विचारलं, धनखड यांच्याकडे तक्रार

MP M M Abdulla CISF misbehavior: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
parliament security
parliament security
Updated on

नवी दिल्ली- डीएमकेचे राज्यसभा खासदार एम एम अब्दुल्ला यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. अब्दुल्ला म्हणालेत की, मला संसदेच्या प्रवेश द्वाराजवळ थांबवण्यात आले आणि मला याठिकाणी येण्याचे कारण विचारण्यात आले.

एम एम अब्दुल्ला यांनी तक्रारी मध्ये म्हटलंय की, CISF जवानाने माझे संसदेत काय काम आहे? असा प्रश्न विचारल्याने मी भयभीत झालो आहे. मी याठिकाणी लोकांचे आणि तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करतो. पण, मला अशा प्रसंगाला कधी सामोरं जावं लागलं नव्हतं. संसदीय सुरक्षा सेवा दल (PSS) होते त्यावेळी माझ्यासोबत असं कधीच झालं नाही.

parliament security
Viral Video: काय सांगता! अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर गेलेल्या पार्सलमध्ये आढळला जिवंत कोब्रा; पाहा धक्कादायक व्हिडिओ

मे महिन्यापासून CISF ने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. यापूर्वी संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी PSS आणि दिल्ली पोलिसांची होती. संसदेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये काहींनी घुसखोरी केली होती. घुसखोर थेट लोकसभा सभागृहापर्यंत पोहोचले होते. त्यांनी रंगाचे कॅन देखील फोडले होते. त्यानंतर संसदेची सुरक्षा PSS कडून CISF कडे देण्यात आली आहे.

अब्दुल्ला यांनी सांगितल्यानुसार, हा प्रकार १८ जून रोजी दुपारी २.४० मिनिटाला घडला. फेरी वाहनामधून मी संसदेच्या आवारात प्रवेश करत होतो. त्यावेळी मला TKR-II येथे थांबवण्यात आले. एका जवानाने मला विचारले की तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात? तुमचं संसदेमध्ये काय काम आहे?

parliament security
Haris Rauf Viral Video: भारतीय चाहता समजून पाकिस्तानी खेळाडू गेला अंगावर धावून मात्र... Video होतोय तुफान व्हायरल

माझा असा विश्वास आहे की, एखादा खासदार कोणतेही काम असताना किंवा नसताना संसदेत जाऊ शकतो. मी कशासाठी संसदेत आलोय हे सभापतींना सांगण्यासाठी मी बांधिल आहे. CISF जवानाने दिलेली वागणूक वाईट होती. त्यांचा परिणाम माझ्यावर पडला आहे, असं ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.