Rahul Gandhi : इराणींबाबत अपशब्द वापरू नयेत;राहुल गांधी यांचे आवाहन

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल कुणीही अपशब्द वापरू नयेत, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. इराणी यांचा लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर समाज माध्यमांवर त्या ट्रोल होत आहे. याबद्दल आज राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर विजय हा जीवनाचा एक भाग आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
Updated on

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल कुणीही अपशब्द वापरू नयेत, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. इराणी यांचा लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर समाज माध्यमांवर त्या ट्रोल होत आहे. याबद्दल आज राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर विजय हा जीवनाचा एक भाग आहे. स्मृती इराणी किंवा इतर नेत्यांबद्दल अपशब्दांचा वापर करू नये. कुणाचा अपमान करणे ही दुर्बलतेची खूण आहे शक्तीची नाही, असे म्हटले आहे.

राहुल गांधी वारीला जाणार?

पंढरपूरच्या आषाढी वारीत राहुल गांधी सामील होणार असल्याचे समजते. परंतु याबाबत अद्यापही काँग्रेसने अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही. राहुल गांधी १३ किंवा १४ जुलैला वारीत सामील होऊन काही किलोमीटर वारकऱ्यांसोबत चालतील, असे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.