Surgical Strike in Manipur: मणिपूरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' करा; भाजपच्या मित्रपक्षाची खळबळजक मागणी

कायमचा तोडगा काढण्यासाठी याची गरज असल्याचं या स्थानिक पक्षानं म्हटलं आहे.
NPP
NPP
Updated on

नवी दिल्ली : पीओकेतील बालाकोट इथं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणारं सर्जिकल स्ट्राईक २०१६ मध्ये सरकारनं केलं होतं. अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक मणिपूरमध्ये करण्यात यावं, त्यामुळं इथली परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी अजब मागणी मणिपूरमधील भाजपच्या सहयोगी पक्षानं केली आहे. (Do Surgical Strike in Manipur a sensational demand from BJP allies NPP)

NPP
Maharashtra Police: शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय; शासन आदेश प्रसिद्ध

मणिपूरमधील नॅशनल पिपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते एम. रामेश्वर सिंह यांनी गेल्या तीन महिन्यांपासून इथली परिस्थिती पाहिली आहे. इथल्या हिंसाचारात १५० जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी असंही म्हटलं की, "गृहमंत्री अमित शहा यांच्या निवदेनातून हे स्पष्ट म्हटलं की, म्यानमारमधून काही कुकी समाजाचे बंडखोर आणि स्थलांतरीत लोक मणिपूरमध्ये आले आहेत. त्यामुळं इथल्या हिंसाचारामागे विदेशी शक्ती असल्याचं मी कायचमचं म्हटलं होतं. यामुळं राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे" (Latest Marathi News)

NPP
Chandani Chowk Inauguration: पुण्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार; गडकरींची घोषणा

मणिपूरमध्ये सर्जिकल स्ट्राईक व्हावा

आपल्यासाठी हे खूपच महत्वाचं आहे की केवळ मणिपूरच वाचवायचं नाही तर संपूर्ण देशाला वाचवायचं आहे. ही परिस्थीतीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकसारख्या काही परिणामकारक कारवाई करणं गरजेचं आहे, असंही रामेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.

NPP
Chandani Chowk Inauguration: पुण्यात बस, मेट्रोला जोडणारं 'वन कार्ड' सुरु करा; फडणवीसांच्या सूचना

कुकी बंडखोरांकडं हत्यारं

माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की, काही एजन्सी हे नरेटिव्ह तयार करत आहेत की, कुकी दहशतवादी सध्या रिलिफ कॅम्पमध्ये आहेत आणि त्यांच्याजवर हत्यारं आहेत. त्यामुळं हा संशय मणिपूरच्या लोकांमध्ये निर्माण होत आहे की, हा कसल्या प्रकारचा नरेटिव्ह तयार केला जात आहे. कुठल्या बाजूनं जाळपोळ केली जात आहे? दुसऱ्या बाजूनं नेमकं कोण गोळीबार करत आहे? (Marathi Tajya Batmya)

NPP
Chandni Chowk Flyover : चांदणी चौक पुलाच्या लोकार्पणावेळी गडकरी मेधा कुलकर्णींना विसरले नाहीत; सांगितली 'ती' आठवण

गेल्या महिन्यात मणिपूरच्या सरकारनं म्यानमारमधून बेकायदा घुसखोरी केलेल्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेण्यास सुरुवात केली. जुलै महिन्यातील काही दिवसांतच ७०० बेकायदा घुसखोरी केल्याचा धक्कादायक चित्र समोर आलं आहे. यामध्ये ७१८ लोकांपैकी ३०१ लहान मुलांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.