Breaking News: निष्काळजीपणाची हद्द! शस्त्रक्रियेवेळी गर्भवतीच्या पोटात राहिला टॉवेल; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Latest News: महिलेच्या पतीने तिथून महिलेला घेऊन जावून तिसऱ्याच एका खासगी रुग्णालयात तिला दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करुन महिलेच्या पोटातून टॉवेल बाहेर काढला. हे नवीन ऑपरेशन मोबाईल कॅमेऱ्यात शूट करण्यात आलेलं आहे. महिलेचे पती आणि नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासह आरोग्य विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.
Latest News
Latest Newsesakal
Updated on

Uttar Pradesh: गर्भवती महिलेच्या प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कहर झालाय. ऑपरेशननंतर डॉक्टरने महिलेच्या पोटातच टॉवेल सोडला. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी दुसरं ऑपरेशन करुन पोटातून टॉवेल काढाला.

ही घटना उत्तर प्रदेशातल्या अलिगढच्या महुआ खेडा येथे घडली आहे. जीटी रोडवर असलेल्या शिव महिमा खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी हा कारनामा केला. येथे एका महिलेची प्रसूती झाली. तेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशनवेळी महिलेच्या पोटातच टॉवेल सोडला. त्यानंतर ऑपरेशन सक्सेस झाल्याचं सागून महिलेचा सुटी दिली.

पीडित महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं की, ऑपरेशननंतर महिलेची तब्येत बिघडली आणि ऑपरेशनच्या जागेतून रक्त येऊ लागलं. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर रुग्णालयाचे संचालकांनी आपल्याच जवळच्या एका रुग्णालयात पाठवून दिलं. तेथे उपचार सुरु झाले परंतु काहीच फरक पडला नाही.

Latest News
RBI MPC Meeting: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोठा निर्णय; तुमच्या कर्जावर होणार थेट परिणाम

महिलेच्या पतीने तिथून महिलेला घेऊन जावून तिसऱ्याच एका खासगी रुग्णालयात तिला दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करुन महिलेच्या पोटातून टॉवेल बाहेर काढला. हे नवीन ऑपरेशन मोबाईल कॅमेऱ्यात शूट करण्यात आलेलं आहे. महिलेचे पती आणि नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासह आरोग्य विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.

ऑपरेशनवेळी रुग्णाच्या पोटामध्ये वस्तू विसरल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अनेकवेळा तर सीझर पोटामध्ये राहिल्याचे प्रकार घडले आहेत. आता चक्क टॉवेल पोटत राहिल्याने डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.