Attack in J&k: जम्मू-काश्मीरमध्ये 4 हल्ले करणारे दहशतवादी कसे दिसतात? स्केच जारी; माहिती देणाऱ्याला इतके लाखांचे बक्षीस

Doda police release sketches: सुरक्षा दलांचे कथुआ जिल्ह्यातील सेदा सोहाल गावामध्ये १५ तासांपासून ऑपरेशन सुरु होते. याठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.
terrorist
terrorist
Updated on

श्रीनगर- दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये एक सीआरपीएफ जवान आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षा दलांचे कथुआ जिल्ह्यातील सेदा सोहाल गावामध्ये १५ तासांपासून ऑपरेशन सुरु होते. याठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

रविवारी यात्रेकरुंच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यापासून जम्मू आणि आश्मीरमध्ये हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. रहिसी जिल्ह्यात झालेल्या या अपघात १० यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता, तर ४१ जण जखमी झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवादी हल्ले झाले आहेत. ताज्या हल्ल्यामध्ये एक सीआरपीएफ जवान शहीद झालाय. सुरक्षादलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात २ पाकिस्तानी दहशतवादी संपल्याचं सांगण्यात आलं आहे.

terrorist
Jammu-Kashmir: यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्याचे स्केच जारी, 20 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा

जम्मू आणि काश्मीरमध्ये रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. कारण, अद्याप दहशतवादी भांडेरवाह, थिथरी, गंडोह आणि इतर भागामध्ये फिरत आहेत. याप्रकरणी दोडा पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. अद्याप दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये आलेल्या चकमकीमध्ये राष्ट्रीय रायफल्स ट्रुपरचे आणि स्पेशल पोलीस फोर्सचे सात जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सकाळी भंद्रेवाह-पठाणकोट हायवेवर असलेल्या एका चेकपोस्टवर हल्ला केला होता. अधिकचे सैन्य तैनात करण्यात आले आहे, तसेच रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.

terrorist
Jammu Kashmir Encounter: गावात घुसले..पाणी मागितलं मग दिसतील त्यांच्यावर गोळीबार...कठुआमध्ये दहशतवाद्यांचा कहर

दोडामध्ये झालेला २४ तासामधील हा दुसरा हल्ला आहे. दहशतवादी पाकिस्तानी असून त्यांचे वय २० ते ४२ वर्षे वयादरम्यान आहे. त्यांच्याकडे एके-सिरिजची रायफल आहे. त्यामुळे सुरक्षादलांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक दल शोधमोहिमेमध्ये गुंतवण्यात आले आहेत. एक दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी एका घरावर हल्ला केला होता. यात दोन रहिवासी जखमी झाले होते. त्यांनतर दहशतवाद्यांनी एका चेकपोस्टवर हल्ला केला होता. यात एक जवान जखमी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.