Rahul Gandhi: राहुल गांधींनी कुत्र्याने नाकारलेली बिस्किटं कार्यकर्त्याला दिली? व्हिडिओ शेअर करत भाजपचा आरोप

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या झारखंडमध्ये असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानच्या एका व्हायरल व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiEsakal
Updated on

नवी दिल्ली: 'भारत जोडो न्याय यात्रे' दरम्यान राहुल गांधी श्वानाच्या पिल्लाला बिस्किटे खाऊ घालतानाचा एका व्हायरल व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या व्हिडीओवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका श्वानाच्या पिल्लाला बिस्कीट खायला घालताना दिसत आहेत आणि नंतर पिल्लाने ते बिस्किट नाकारल्यानंतर राहुल गांधीनी ते बिस्कीट जवळ असलेल्या कार्यकर्त्यांला देताना दिसत आहेत. दरम्यान, अधिकृत भारत जोडो न्याय यात्रा हँडलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिस्किट क्लिपचा समावेश नव्हता.

Rahul Gandhi
EC informs SC: मतदार यादीतून तब्बल 1.66 कोटी नावं काढली; निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

या एका व्हायरल व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोमवारी रात्री उशिरा 'भारत जोडो न्याय यात्रे' दरम्यानचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी एका काँग्रेस कार्यकर्त्याला श्वानाने नाकारलेले बिस्किटे देताना दिसत आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi On Reservation : ...तर आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार! राहुल गांधींची मोठी घोषणा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करताना अमित मालवीय यांनी म्हटलं आहे की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना श्वानांशी केली होती आणि इथे राहुल गांधी दौऱ्यावेळी श्वानाने नाकारलेली बिस्किटे त्यांच्या कार्यकर्त्याला दिली आहेत.'

यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, 'एखाद्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना श्वानासारखे वागवत असतील, तर असा पक्ष नाहीसा होणे स्वाभाविक आहे.'

त्यांनी या पोस्टमध्ये सवाल उपस्थित केला आहे, 'आता 'शहजादा' पक्षाच्या कार्यकर्त्याला श्वानाने नाकारलेले बिस्किट देत आहे. हाच त्यांच्या कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा आणि मतदारांचा आदर आहे का?'.

Rahul Gandhi
Kavi Kumar Vishwas: राज्यसभेसाठी कवी कुमार विश्वास यांचे नाव! भाजपने तयार केलेल्या यादीत आहेत दावेदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.