भारतातील हवाई प्रवासी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात येत्या काही महिन्यांमध्ये एक असामान्य परिस्थिती पाहतील. इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत प्रवासासाठी हवाई उड्डाणाचे दर वाढणार आहे तर नियोजित उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे दर कमी होणार आहे.
ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते चार आठवड्यांत देशांतर्गत क्षेत्रातील काही ट्रंक मार्गांवरील भाडे 15-30 टक्क्यांनी वाढले आहे. (Domestic air fare up on oil spike but flights abroad may get cheaper)
ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी ixigo ने सांगितले की, ''25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान दिल्ली-मुंबई क्षेत्रातील बुकिंगसाठी वन वे विमान प्रवासाचे भाडे 5,119 होते, जे 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यानच्या बुकिंगसाठी 4,055 रुपयांपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे, कोलकाता-दिल्ली क्षेत्रातील वन वे विमान तिकिटाची किंमत 4,725 रुपयांवरून 29 टक्क्यांनी वाढून 6,114 रुपये झाली आहे. दिल्ली-बंगळुरूचे भाडेही ४,९१६ रुपयांवरून ६,२३९ रुपये झाले.
देशांतर्गत क्षेत्रांवर, विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांची किंमत 15 दिवसांच्या रोलिंग कालावधीसाठी fare ceiling मध्ये करणे बंधनकारक आहे.उदाहरणार्थ, 1 मार्च ते 16 मार्चपर्यंतच्या फ्लाइटची तिकिटे भाड्याच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त(fare ceiling) किंवा floor fare भाड्यापेक्षा कमी विकली जाऊ शकत नाहीत. पण, एअरलाइन्स 17 मार्चच्या फ्लाइटच्या तिकिटांची किंमत त्यांना योग्य वाटतील त्याप्रमाणे असतील. त्याचप्रमाणे, 2 मार्च ते 17 मार्च पर्यंतच्या फ्लाइटच्या तिकिटांची किंमत भाड्याच्या मर्यादेत (fare range) असेल.
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जेट(Jet)विमानाचे इंधन महागले आहे, परिणामी विमान कंपन्यांनी भाडे वाढवले आहे. 1 मार्च 2021 पासून दिल्लीत विमानचालन टर्बाइन इंधनाची किंमत 95,350.66 रुपये प्रति किलोलीटर आहे, जी 1 मार्च 2021 रोजी 59,400.91 रुपये प्रति किलोलीटर होती. कारण: ब्रेंट क्रूडची किंमत 8 मार्च रोजी प्रति बॅरल $ 129.47 पर्यंत वाढली जी मागील वर्षी 10 मार्च रोजी प्रति बॅरल $ 68.18 होती.
Yatra.com च्या प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले: “इंधनाच्या किमती वाढल्यामुळे सर्व देशांतर्गत मार्गांवर विमान भाड्यात २०% वाढ झाली आहे. आम्ही Yatra.com वर पाहिलं आहे की दिल्ली, गोवा, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद आणि कोलकाता या देशांतर्गत मार्गांवर गेल्या काही आठवड्यांपासू विमान भाडे तसेच बुकिंग चौकशीत वाढ झाली आहे. "
उन्हाळा हा पर्यटनाचा सर्वोच्च काळ आहे. या सुट्टीच्या काळात सलग दोन वर्षांच्या कमी प्रवासाच्या मागणीनंतर, एअरलाइन्समध्ये आता त्यांची वाढलेली यादी विकण्यासाठी स्पर्धा होऊ शकते. इंधनाच्या किमती अजूनही बिघडतील का हे पाहणे अद्याप बाकी आहे. परंतु भारतातील आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी, ज्याने देशांतर्गत उड्डाणे सारख्याच विमान भाडे आकारत असल्याचे दिसून येत आहे. 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय नियोजित व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू केल्याने काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे कारण तेलाच्या वाढत्या किमती अजूनही वाढत असून एअरलाईन्स आता भारतातून आतंरराष्ट्रीय उड्डानाची संख्या वाढवू शकतात ज्यावर एअर बबल अंतर्गत बंधणे टाकण्यात आली होती.
व्यवस्थेनुसार, एअरलाइन्स दर आठवड्याला भारतातून सुमारे 2,000 आंतरराष्ट्रीय उड्डाणे करतात. हे प्रमाण साथीच्या रोगाने नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंधणे लागू करण्यापूर्वी भारतातून दर आठवड्याला होणाऱ्या ४,७०० उड्डानंपैकी निम्म्याहून कमी आहे
युक्रेनचे संकट आणि तेलाच्या वाढत्या किमती यांसारख्या अलीकडील बृहत आर्थिक घटकांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय फ्लाइटवरील या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय भाडे वाढले होते. उदाहरणार्थ, ixigo डेटानुसार, (कोविडपूर्वी) फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली ते दुबईचे सरासरी राउंड ट्रिप भाडे 24,751 रुपये होते आणि तेच फेब्रुवारी 2022 पर्यंत बबल फ्लाइट्सच्या अंतर्गत 32,651 रुपये होते म्हणजेच यामध्ये 32 टक्क्यांनी वाढ झाली होती
त्याचप्रमाणे, फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली-माद्रिद मार्गावरील सरासरी भाडे 48,418 रुपये होते; फेब्रुवारी 2022 मध्ये ते 39 टक्क्यांनी वाढून 67,436 रुपयांवर पोहोचले.
“नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या रद्द झाल्यामुळे मागणी-पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाले होते, ज्यामुळे बबल करारांतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवास महाग झाला होता. आता क्षमता, (कनेक्टिव्हिटी) अधिक मार्गांमध्ये वाढ झाल्याने, येत्या काही महिन्यांत आम्ही आंतरराष्ट्रीय भाड्यात घट होण्याची अपेक्षा करू शकतो, अशी माहिती इक्सिगोचे सह-संस्थापक आणि ग्रुप सीईओ आलोके बाजपेयी यांनी दिली.
“भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासाची मागणी वाढत आहे आणि ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, यूएस आणि यूके सारख्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी Travel search queries मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मेलबर्न, अॅडलेड आणि सिडनी सारख्या ऑस्ट्रेलियन शहरांसाठी भारतातून Travel search queries या महिन्यात 15-20% वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि जगभरातील नियमांमध्ये शिथिलता यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बुक करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रवाशांचा ट्रेंड आम्ही पाहत आहोत,” तो पुढे म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.