डॉमिनोज ही जगप्रसिद्ध फूड पिझ्झा डिलीवरी साईट असून लाखो लोक रोज या साईटवरून पिझ्झा ऑर्डर करत असतात. तसेच अनेकजण डॉमिनोजमध्ये जाऊनही आवडीने पिझ्झा खातात. मात्र ट्विटरवर एका तरूणीने पिझ्झा मेकिंगच्या ठिकाणचं असं काही दृष्य ट्विटरवर शेअर केलंय ज्यामुळे लोकांचा डॉमिनोजवरचा विश्वास उडेल. खाण्याच्या वस्तूंबाबत बाळगला जाणारा निष्काळजीपणा या तरूणीने सोशल मीडियावर दाखवत सगळ्यांना चकीत केलंय.
टॉयलेट ब्रश टांगले असलेल्या ठिकाणी पिझ्झा डो
एका तरूणीने तिच्या ट्विटरवरून बेंगलूरू शहरातील एका डॉमिनोज सेंटरमधील एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये चक्क टॉयलेट ब्रश टांगले असलेल्या ठिकाणी पिझ्झा डो (पिझ्झा बनवण्याचं पीठ) ट्रे मध्ये ठेवलेले होते. पिझ्झा डो चे ट्रे एकावर एक ठेवले असलेल्या या ठिकाणी थेट ट्रेच्या अगदीच वर दोन टॉयलेट ब्रश दिसताय. आणि हे ब्रश चक्क पिझ्झा डो ला लागताय. टॉयलेट ब्रशच्या थेट खाली पिझ्झा डो ठेवले जात असतील तर पिझ्झा आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकतो याचा अंदाज लावता येईल. तसेच याठिकाणी कपडे देखील टांगलेले दिसत आहेत. खाण्याच्या वस्तूंबाबत असला निष्काळजीपणा बघून अनेकांनी यानंतर डॉमिनोजवरून पिझ्झा घेणार नसल्याचे म्हटले आहे.
खाण्याचे पदार्थ बनवण्याची जागा फार वाईट असल्याचंही यावेळी बोललं जातंय. अनेकांनी डॉमिनोजमधील निष्काळजीपणा बघितल्यानंतर डॉमिनोजचा पिझ्झा न खाण्याबाबत ट्विट केलंय. तसेच अनेकांना डॉमिनोज सेंटरमधील हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत डॉमिनोजमधील गंभीर सत्य नेटकऱ्यांना दाखवलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.