अयोध्या श्री राम मंदीर निर्मिती : 22 कोटींचे चेक बाऊंस, तर 15 हजार चेक रिटर्न

आतापर्यंत मंदिराच्या निर्मितीसाठी देशभरातून 3 हजार 400 कोटी रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत.
Ayodhya Shri Ram Temple
Ayodhya Shri Ram TempleTeam eSakal
Updated on

लखनौ : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथे भव्य राम मंदिराची (Shri Ram Temple Ayodhya) निर्मिती केली जात आहे. यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात देणगी स्वरुपात निधी गोळा केला जात आहे. आतापर्यंत यासाठी देशभरातून 3 हजार 400 कोटी रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत. तर, 22 कोटींहून अधिकचे धनादेश बाऊन्स झाले आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेने जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. मात्र, हे धनादेश कोणत्या कारणांमुळे बाऊंस झाले, याची नेमकी कारणं अद्याप समजू शकलेली नाहीत. (Ayodhya Ram Mandir Temple Donation News)

Ayodhya Shri Ram Temple
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण यांचा विरोध कायम

22 कोटींचे चेक बाऊंस, तर 15 हजार चेक रिटर्न

श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी देण्यात आलेल्या देणगी स्वरुपातल धनादेशांपैकी सुमारे 22 कोटी रुपयांचे अनेक धनादेश बाऊन्स झाले असून, बाऊंस होणारे अशा प्रकारचे धनादेश वेगळे करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे कोणता धनादेश कशामुळे बाऊन्स झाला याची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे बाऊंस झालेले धनादेश बँकेसोबतच्या चर्चेनंतर पुन्हा सादर केले जाणार आहेत.

Ayodhya Shri Ram Temple
Sakal Impact: राम मंदिर स्थानकात सुरक्षेकडे लक्ष देणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

चेक बाऊंस होण्यामध्ये अयोध्या जिल्हा आघाडीवर

दरम्यान, राम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी म्हणून देण्यात आलेल्या धनादेशांमध्ये सर्वाधिक बाऊन्स होणारे धनादेश हे अयोध्या जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. अयोध्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 2 हजारांहून अधिक धनदेश बाऊन्स झाले आहेत. तर देशभरातून आलेल्या 15 हजारांहून अधिक लोकांचे धनादेश विविध कारणांमुळे रिटर्न आले आहेत. त्यात खात्यातील शिल्लक हेही प्रमुख कारण आहे.

Ayodhya Shri Ram Temple
Video: वाळू शिल्पकाराने पुरीमध्ये साकारले अयोध्याचे राम मंदिर

कोणी किती निधी दिला

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांची संख्या 31 हजार 663 इतकी आहे. त्याच वेळी, 5 ते 10 लाखांपर्यंत देणगी देणाऱ्यांची संख्या 1,428 असून, 10 ते 25 लाखांपर्यंतच्या देणगीदारांची संख्या 950 इतकी आहे. 25 ते 50 लाखांची देणगी देणाऱ्यांची संख्या 123 असून, 50 ते 1 कोटींपर्यंतच्या देणगीदारांची संख्या 127 आहे. तर, एक कोटीहून अधिकची देणगी देणाऱ्यांची संख्या 74 इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.