
जीनिव्हा : कोरोनाची साथ येऊन दोन वर्ष होऊन असून जगातील सर्व देश त्यातून बाहेर पडण्याची धडपड करीत आहे. ही साथ कधी संपुष्टात येईल, याचा अंदाज कोणीही व्यक्त करू शकेल, असे मला वाटत नाही. ही साथ संपल्याचा दावा अनेकजण करीत आहेत, पण अशी घोषणा कोणी करू नये. कोरोनाला रोखण्यासाठीचे नियम न पाळणे मूर्खपणाचे होईल. सर्व खबरदारी अद्याप घेणे आवश्यक आहे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) प्रमुख डॉ. सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांनी दिला. (World Health Orgnisation)
‘ब्लूमबर्ग क्विकटेक’च्या ‘एम्मा बार्नेट मिट्स’ या कार्यक्रमास स्वामिनाथन यांनी मुलाखत घेण्यात आली होती. तिचे प्रसारण शुक्रवारी करण्यात आले. कोरोनासाथीमुळे निर्माण झालेली स्थिती २०२२ च्या अखेरीस परिस्थिती सुधारलेली असेल, अशी आशा आहे. विषाणूचे नवे प्रकार कोठेही उद्भवू शकतात आणि आपण फिरून पुन्हा त्यात ठिकाणी येऊ शकतो. म्हणूनच सावधगिरी बाळगायला हवी, असे त्या म्हणाल्या. (WHO)
राजकारणासाठी विज्ञानाचा वापर धक्कादायक
राजकारणासाठी विज्ञानाचा वापर होणे हे धक्कादायक आहे का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की मला सर्वात जास्त धक्का बसलेल्या गोष्टींपैकी ती एक होती. शास्त्रज्ञ व विज्ञानाचा होणारा गैरवापर पाहून मी खूप निराश झाले होते आणि सध्याच्या जागतिक साथीत तर त्याने कळसच गाठला. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. (Soumya Swaminathan)
डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या...
- कोरोना साथीचे प्राथमिक कारण न समजणे ही मोठी गोष्ट नाही. यापूर्वी आलेल्या साथींमध्येही विषाणूंची उत्पत्ती कशी झाली हे समजण्यास अनेक वर्षे लागली. उदा. ‘सार्स’चा उगम सिवेट मांजरांपासून आणि ‘मर्स’चा उगम उंटामधून झाला हे समजण्यास खूप वर्षे गेली. ‘एचआयव्ही’चे केंद्रस्थान चिंपाझी असल्याचेही अनेक वर्षांनंतर लक्षात आले.
- कोरोनाची साथ येऊन दोन वर्ष होऊन असून जगातील सर्व देश त्यातून बाहेर पडण्याची धडपड करीत आहे. पण शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांसमोरील आव्हान अद्याप कायम आहे.
- कोरोनाच्या साथीचा उगम कोठून झाला हे ठरविण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि ‘डब्लूएचओ’साठी जागतिक समर्थन मिळविणे, असा मोठा पल्ला गाठायचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.