BJP Candidate: 'मी भाजपमध्ये आहे म्हणून मला गद्दार म्हणाले', भाजपच्या एकमेव मुस्लिम उमेदवाराची व्यथा

Dr. Abdul Salam: डॉ. सलाम यांना भाजपने मलप्पुरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात ६८.३ टक्के मुस्लिम मतदार आहेत.
Dr. Abdul Salam Only BJP Candidate
Dr. Abdul Salam Only BJP CandidateEsakal
Updated on

केरळमधील भारतीय जनता पक्षाचे एकमेव मुस्लिम उमेदवार डॉ. अब्दुल सलाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना गद्दार म्हटले जात आहे.

डॉ. सलाम यांना भाजपने मलप्पुरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात ६८.३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. अशा परिस्थितीत आपल्याच समाजातील लोकांसमोर जाताना खूप वाईट अनुभव येत आहेत. यामुळे डॉ. सलाम यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. (Dr. Abdul Salam Only Muslim Candidate For Loksabha Election 2024 From BJP)

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील मलप्पुरम लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अब्दुल सलाम यांनी लोक त्यांचा अपमान करत असल्याचा खुलासा केला आहे.

एका मशिदीत ईदच्या नमाजानंतर एका ६० वर्षीय मुस्लिम व्यक्तीने त्यांचा अपमान केला आणि गद्दार म्हटले, असे त्यांनी सांगितले आहे. हे ऐकूनही तिथे उभे असलेले लोक गप्प बसले, कदाचित मी भाजपमध्ये असल्यामुळेच ते काही बोलले नाहीत, असे सलाम यांनी सांगितले.

Dr. Abdul Salam Only BJP Candidate
Viral Video: हैदराबादमधील मशिदीवर भाजप उमेदवार माधवी लतांचा 'बाण मारण्याचा' व्हिडिओ व्हायरल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अब्दुल सलाम हे भाजपचे एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत. भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तेव्हा त्यात अब्दुल सलाम यांचेही नाव होते.

अब्दुल सलाम हे केरळमधील धर्मनिरपेक्ष चेहरा आहेत. डॉ. सलाम हे कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि 2011 ते 2015 पर्यंत त्यांनी कुलगुरू म्हणून काम केले आहे.

Dr. Abdul Salam Only BJP Candidate
Arvind Kejriwal: केजरीवालांना तिहार जेलमध्ये मिळत नाहीये इन्सुलिन, आपचा आरोप; उपराज्यपालांनी मागवला अहवाल

केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 20 जागा आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी सर्व 20 जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. तर, 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024 एकूण 7 टप्प्यात पार पडणार आहे. देशातील एकूण 543 जागांसाठी एक-एक करून 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.