Madras HC on Ambedkar: मद्रास कोर्टाचा आदेश; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोर्ट परिसरातून हटवा, अन्यथा कारवाई करु

Dr. Babasaheb Ambedkar: मद्रास हाय कोर्टाचे परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हटवण्याचे आदेश, फक्त महात्मा गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांचे फोटो राहतील
Madras High Court
Madras High Courtesakal
Updated on

Madras High Court Order:मद्रास उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयांना एक परिपत्रक जारी केलंय. ज्यात सांगण्यात आलंय की तमिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या न्यायालयात परिसरात महात्मा गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्याशिवाय कोणाचाही फोटो लावू नये.

मद्रास उच्च न्यायालय म्हणालं की तमिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या जिल्हा न्यायालयांमध्ये फक्त महात्मा गांधी तमिळ संत कवी तिरुवलल्लुवर यांचा फोटो लावण्यात यावा. कोर्टाने सक्तीने सांगितलंय की कोर्टात इतर कोणाचाही फोटो लावण्यात येणार नाही.

उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्यावतीने परिपत्रक जारी करण्यात आलं ज्यात सांगण्यात आलं आहे की जर कोर्टात दुसऱ्या कोणाचाही फोटो लावण्यात आलेला असेल तर तो हटवण्यात यावा.

कांचीपुरम येथील प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणाले की ते अलंदूर बार असोसिएशनला सांगतील की नव्याने बांधलेल्या कोर्ट परिसरातील गेटवर लावण्यात आलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटवण्यात यावा.

हे प्रकरण तेव्हा प्रकाशझोतात आले तेव्हा वकिलांच्या संघटनेने बाबासाहेब आंबडेकरांच्या मुर्तीचं आणि फोटोचं उद्घाटन करण्याची परवानगी मागितली.

Madras High Court
Sinnar Toll Naka: सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरेंसोबत काय घडलं? तोडफोडीवर मनसेचे स्पष्टीकरण

११ जुलैला झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अशा प्रकारच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फुल कोर्ट मीटिंगमध्ये एक नविन प्रस्ताव पारित केला. या प्रस्तावात सांगण्यात आलंय की कोर्ट परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा राष्ट्रीय महापुरुषांच्या मुर्त्या किंवा फोटोंची विटंबना केली गेली आहे. (Latest Marathi News)

अशा गोष्टीनंतर तणावाची परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कोर्टातं महात्मा गांधी आणि संत कवी तिरुवल्लुवर यांच्याव्यतिरिक्त कोणचाही फोटो किंवा मुर्ती लावण्याची परवनगी मिळणार नाही.

Madras High Court
Jyotiraditya Scindia: 'आम्ही गद्दार होतो तर...'; ज्योतिरादित्य शिंदेंचे काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर

एप्रिल २०१३मध्येही अलंदुर कोर्टातील बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटवण्यात यावा असे निर्देश देण्यात आले होते.

रजिस्ट्रार जनरल यांनी आपल्या परिपत्रकात म्हटलंय की तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील कोर्टांमधील बार असोसिएशनने जर या आदेशाची अवहेलना केली तर त्यांच्याविरोधात योग्य कारवाई केली जाईल.

Madras High Court
Jui Gadkari On Khalapur Landslide: जुई गडकरीने करुन दाखवलं! इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी केली मोठी मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.