कर्नाटकमधील काॅंग्रेसचे नेते तसेच शिग्गाव विधानसभेचे माजी आमदार सईद आझमपीर खादरी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केलं आहे. त्यावरुन आता भाजपने खादरी यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, असे खादरी यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत विधान केले.