Draupadi Murmu यांनी शपथविधीवेळी का परिधान केली संथाली साडी? जाणून घ्या...

द्रौपदी मुर्मू यांनी आज २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली
Draupadi Murmu
Draupadi Murmuesakal
Updated on

द्रौपदी मुर्मू यांनी आज २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. यावेळी देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या मुर्मू अतिशय साधेपणाने शपथविधीसाठी आल्या होत्या. त्यांचा हा साधेपणा अनेकांचा भावला. संथाली साडी, पांढऱ्या रंगाची स्लीपर घालून त्यांनी १५व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यामुळे संथाली साडी सध्या चर्चेत आहे.

Draupadi Murmu
बुक बँकच्या आधारे अभ्यास, शाळेसाठी एकच फ्रॉक; मुर्मूंचा शैक्षणिक संघर्ष

मुर्मू या जी साडी नेसतात ती संथाली साडी हाताने बनवलेली आहे. वेगवेगळ्या रंगाचे धागे हाताने एकमेकांमध्ये गुंफून ही साडी तयार होते. साडीवरील हे डिझाइन म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या इच्छेचे प्रतीक होते. पूर्वीच्या काळी या, संथाली साडीवर धनुष्य आणि बाणाचे डिझाइन विणलेले असायचे. मात्र आता या साड्यांवर मोर, फुलं, बदक अशी वेगवेगळी डिझाइन्स वा नक्षीकाम केलेले दिसते.

...म्हणून या साडीचे नाव संथाली

मयुरभंज जिल्ह्यातील फुटा / फोडा येथे या साड्या तयार केल्या जातात. संपूर्णपणे हाताने विणलेल्या ( हँडलूम) कॉटनच्या या साडीसाठी कमीत कमी धाग्यांचा वापर केला जातो. ओडिशामधील संथाल आदिवासी, या साड्या तयार करतात आणि म्हणूनच त्या साड्या ‘संथाली’ नावाने ओळखल्या जातात.

Draupadi Murmu
भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन् पूर्णही करु शकतो; शपथ घेताना राष्ट्रपती मुर्मू भावूक

ओडिशामधील स्थानिक बाजारात या साड्यांची किंमत 1000 ते 5000 रुपयादरम्यान असते. मात्र ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ही साडी खरेदी करायची झाल्यास ब्रँडनुसार, तिची किंमत वाढत जाते. संथाली साडी ही केवळ झारखंडच नव्हे तर शेजारील राज्य ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसामसह अन्य राज्यातदेखील चर्चे आहे.

पारंपारिक पद्धतीने ही साडी तयार केली जाते. पांढऱ्या रंगाच्या कॉटनच्या कापडावर रंगीबेरंगी दोऱ्यांनी ‘चेक्स’ (डिझाइन) विणले जाते. मात्र ही साडी केवळ काही खास प्रसंग वा समारंभांदरम्यानच नेसली जाते. संथाली आदिवासी समाजात लग्न समारंभादरम्यान ही साडी नेसत नाहीत. त्याऐवजी पिवळ्या वा लाल रंगाची साडी नेसतात किंवा भेट दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.