Pradeep Kurulkar : हनीट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट! चक्क डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये महिलांना भेटायचा कुरुलकर

DRDO Espionage Case
DRDO Espionage Case
Updated on

डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात प्रदीप कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही महत्त्वाची माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर हे एका ईमेल आयडीचा वापर करायचे अशी माहिती देखील समोर आली आहे.

इतकेच नाही तर डीआरडीओ येथील गेस्ट हाऊस मध्ये काही महिलांना देखील कुरुलकर भेटल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता या अनुषंगाने देखील एटीएस तपास करणार आहे.

DRDO Espionage Case
Uddhav Thackeray News : ...तर राज्यपाल पद रद्द करावं; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

प्रकरण काय आहे?

डीआरडीओ संचालक आणि शास्त्रज्ञ असलेले प्रदीप कुरूलकर हे २०२२ पासून पाकिस्तानी एजेंट्सच्या संपर्कात होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत पुण्यातून अटक केली.

त्यांनी हनीट्रपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या महिली गुप्त एजेंटनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपीशी संपर्क केला होता. तेव्हापासूनच व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ते संपर्कात होते. एटीएस आधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत कुरुलकर यांनी महिलेशी व्हिडीओ चॅट केल्याचं मान्य केलं होतं.

DRDO Espionage Case
Uddhav Thackeray : "मी राजीनाम्याच्या निर्णयावर समाधानी, जीवदान मिळालं ते तात्पुरतं…"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()