DRDO ने बनवलं 'सॉ', क्षणात चीन-पाकिस्तानची धावपट्टी होईल उद्धवस्त

इलेक्ट्रो ऑप्टीकलमध्ये इन्फ्रा-रेड टेक्नोलॉजी असून यामुळे लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने प्रहार होईल.
iaf
iaffile photo
Updated on

नवी दिल्ली: संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO) आणि इंडियन एअर फोर्सने (IAF) आठवड्याभरात दुसऱ्यांदा स्मार्ट अँटी-एअरफिल्ड वेपन्स (सॉ) या अस्त्राची यशस्वी चाचणी केली. 'सॉ' हे (Saaw) स्वदेशी बनावटीचे अस्त्र आहे. उपग्रह दिशादर्शन आणि इलेक्ट्रो-ऑप्टीकल सेन्सर्सच्या आधारे 'सॉ' च्या दोन उड्डाण चाचण्या (Flight test) घेण्यात आल्या. मागच्या गुरुवारी पहिली चाचणी घेण्यात आली. भारतात पहिल्यांदाच या प्रकारच्या बॉम्बची इलेक्ट्रो ऑप्टीकल सीकर आधारीत उड्डाण चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. 'सॉ' ची निर्मिती ही चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे.

जैसलमेरच्या चंदन रेंजवरुन एअर फोर्सच्या फायटर जेटमधून दुसरी चाचणी करण्यात आली. इलेक्ट्रो ऑप्टीकलमध्ये इन्फ्रा-रेड टेक्नोलॉजी असून यामुळे लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने प्रहार होईल. 'सॉ' अस्त्रामध्ये शत्रुची धावपट्टी उद्धवस्त करण्याची क्षमता आहे. १०० किमीच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या शस्त्राची क्षमता आहे.

iaf
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज सोडणार

१२५ किलो स्फोटक 'सॉ' मधुन डागता येऊ शकतात. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही उड्डाण चाचण्यांमध्ये मोहिमेची उद्दिष्टय पूर्ण झाली. अत्याधुनिक गायडन्स, दिशादर्शन, सॉफ्टवेअरने मोहिमेच्या गरजेनुसार काम केले. यापूर्वी जानेवारी महिन्यात डीआरडीओने 'सॉ' ची चाचणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.